आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्मेटची सक्ती:अकोल्यात हेल्मेट न घालणाऱ्या 22 पोलिसांना दंड, आरटीओ अधिकाऱ्यांनी अकोला पाेलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन तपासणी केली

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्मेट न घालणाऱ्या २२ पोलिस कर्मचाऱ्यांनाच आरटीओने ६ एप्रिल रोजी दंड ठाेठावला. थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन कारवाया करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अकोला जिल्ह्यात शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. मात्र अनेक शासकीय कार्यालयांत कर्मचारी व अभ्यागत या नियमांचे पालन करत नाहीत. त्यांच्याविरोधात कुणी कारवाईही करत नाही. मात्र आरटीओ विभागाने आता धडक कारवाई सुरू केली आहे. सर्वात आधी आपल्याच कर्मचाऱ्यांना त्यांनी हेल्मेट सक्तीचे केले. पोलिस अधीक्षक कार्यालयात बुधवारी एका पथकाने धडक देऊन कारवाया केल्या. २२ पाेलिस कर्मचाऱ्यांना दंड ठाेठावण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...