आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला मनपासमोर 147 कोटी रुपये कर वसुलीचे आव्हान:महापालिका प्रशासनाने वसुलीला वेग येण्यासाठी विशेष पथक नियुक्त

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चालू आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी आता केवळ दोन महिने राहिले आहे. या दोन महिन्यात महापालिकेला चालु तसेच थकीत अशी 147 कोटी रुपयाच्या मालमत्ता कराच्या वसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे. कराची वसुली वेगाने व्हावी, यासाठी नियमीत कर्मचाऱ्यांसोबत विशेष पथकही तयार करण्यात आले आहे. दरम्यान ज्या नागरिकांकडे मालमत्ता कर थकीत आहे, त्या नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करुन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महापालिकेचे स्वत:च्या उत्पन्नापैकी मालमत्ता कर हा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. त्यामुळे प्रत्येक आयुक्त मालमत्ता कर वसुलीवर लक्ष केंद्रित करीत असतात. यावेळीही आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी मालमत्ता कर वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी कर वसुली करणाऱ्या नियमित कर वसुली लिपिकासोबतच प्रत्येक झोन मध्ये प्रत्येकी चार विशेष पथक तयार करण्यात आली आहे.

थकीत कराचा भरणा न करणाऱ्या नागरिकांच्या मालमत्तांना सिल लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तसेच या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय देखिल महापालिकेने घेतला आहे. महापालिकेला चालु आर्थिक वर्षात 122 कोटी 25 लाख थकीत तर 79 कोटी 59 लाख चालु आर्थिक वर्षातील असा 201 कोटी 84 लाख रुपयाचा कर वसुलीचे उद्दीष्ठ होते. आता पर्यत थकीत करापैकी 27 कोटी 79 लाख रुपये तर चालु आर्थिक वर्षातील 26 कोटी 32 लाख रुपये असा एकूण 54 कोटी 11 लाख रुपयाचा कर वसुल करता आलेला आहे. तर आता दोन महिन्यात 94 कोटी ४५ लाख रुपये थकीत आणि चालु आर्थिक वर्षातील 53 कोटी 26 लाख असा एकुण 147 कोटी 72 लाख रुपयाचा कर वसुल करावा लागणार आहे.

दोन हप्त्यातही कर भरता येणार

थकीत करावर दरमहा दोन टक्के म्हणजेच वर्षाला 24 टक्के कर आकारला जातो. त्यामुळे नागरिकांना थकीत कराचा भरणा एकाच वेळी करताना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेवून थकीत कराचा भरणा दोन हप्त्यात करण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध केली आहे.

बातम्या आणखी आहेत...