आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिकांची उत्पादकता वाढ व शेतकऱ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी कृषी आयुक्तालयमार्फत रब्बी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच रब्बी पिकांची निवड करण्यात आली असून स्पर्धेकरीता शनिवार, 31 डिसेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होते. त्यामुळे ते अधिक उमेदीने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडण्यास मदत होईल. हा उद्देश ठेवून कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येते.
स्पर्धेतील पीके व अटीशर्ती
रब्बी पिके ज्वारी, गहू, हरभरा,करडई व जवस असे एकूण पाच पिके. पीक स्पर्धेतील पिकांची निवड करताना त्या पिकांचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र कमिान 1 हजार हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र 1 एकार हेक्टर पेक्षा कमी असल्यास व स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. पिक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर त्या पीकाखाली भात पिकासाठी कमिान 20 आर व इतर पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक राहिल.
विजेत्या शेतकऱ्यांना बक्षिस
पीक स्पर्धेत विजेते ठरलेल्या सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावर पहिले पारितोषिक 5 हजार रुपये, व्दितीय पारितोषिक 3 हजार रुपये व तिसरे पारितोषिक 2 हजार रुपये. जिल्हास्तरावरील विजेत्यांसाठी पहिले पारितोषीक 10 हजार रुपये, व्दितीय पारितोषिक 7 हजार रुपये व तिसरे पारितोषिक 5 हजार रुपये आणि राज्यस्तरावरील विजेत्यांसाठी पहिले पारितोषिक 50 हजार रुपये, व्दितीय पारितोषिक 40 हजार रुपये व तिसरे पारितोषिक 30 हजार रुपये मिळणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.