आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन अल्पवयीन मुलींना कोल्ड्रिंक्समध्ये दारु पाजून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
16 डिसेंबरला रात्रीच्या दरम्यान दोन अल्पवयीन मुली आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून घराकडे निघाल्या होत्या. वाटेत त्यांना एक ओळखीचाच युवक भेटला, मी तुम्हाला घरी सोडून देतो. असे म्हणून त्याने दुचाकीवर बसून दोघींनाही सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पवन वाटिकेत नेले. त्यानंतर इथे त्याने चॉकलेट आणि कोल्ड्रिंक्स प्यायला दिले.
यावेळी त्या दोघींनी कोल्ड्रिंक्स पिले आणि चॉकलेट खाल्ले. कोल्ड्रिंक्स प्यायल्यानंतर त्यांना गुंगी यायला लागली. तो युवक त्या दोघींनाही घेऊन टेरेसवर गेला, अन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी त्याचा मित्रही तिथे दाखल झाला आणि त्यानेही त्या दोघींवर अत्याचार केले. या संपूर्ण घटनेत चार ते पाच जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान दोन्ही अल्पवयीन मुलींना घरी पोहचायला उशीर झाला. घरच्यांनी या दोन्ही मुलींना उशिरा आल्याबद्दल विचारणा केली, त्यानंतर मुलींनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. दोन्ही मुलींच्या नातेवाईकांनी लागलीच सिव्हिल लाइन पोलिस ठाणे गाठले. मुलीवर झालेल्या अत्याचारबद्दल तक्रार दिली. सध्या या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. अत्याचार करणाऱ्या तरुणांनी दोन्ही मुलींना कोल्ड्रिंगमध्ये दारू दिली की अथवा दुसरे काही याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत. तरीही आता वैद्यकीय चौकशीतच या सर्व बाबी स्पष्ट होणार. याप्रकरणी पुढील तपास एपीआय कांबळे करीत आहेत.
पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात
या प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश, करण आणि रोहित अशा तिघांना ताब्यात घेतले. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेशने या दोन्ही मुलींना आपल्या दुचाकी गाडीवर बसवून पवन वाटिकेत घेवून गेला. त्यानंतर इथे कोल्ड्रिंक्समध्ये ऋषिकेशने दारू देऊन दोन्ही मुलीवर अत्याचार केला आहे. यासोबतच त्याच्या साथीदाराने तिच्यावर अत्याचार केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.