आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोक्सोच्या विशेष न्यायालयाचा निकाल:दोन वर्षात गुन्ह्याचा फैसला; चौथीतील मुलीवर बलात्कार, आरोपीला जन्मठेप!

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिन्ही कलमांमध्ये ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला विशेष न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला.

स्वप्नील विनोद डोंगरे रा. अजनी खु. ता. बार्शीटाकळी असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. घटनेच्यावेळी आरोपी हा 21 वर्षाचा होता. तर पीडित मुलगी ही चौथ्या वर्गात शिकत होती. घराशेजारील मुलगी ही तिसऱ्या वर्गात शिकत असतानापासूनच आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. मुलीच्या आईने 11 जुलै 2019 रोजी बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भांदविचे कलम 376, पोक्सो 3,4, व 5,6, व 11,12 नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासले. आरोपी पक्ष सबळ पुरावा न्यायालयात सादर करू शकले नाहीत. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीला कलम 376 मध्ये जन्मठेप, एक लाख रुपये दंड, पोक्सो 3,4 मध्ये जन्मठेप, एक लाख रुपये दंड, पोक्सो 5,6 मध्ये जन्मठेप व एक लाखरुपये दंड, पोक्सो 11,12 मध्ये तीन वर्षाची शिक्षा व 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. सरकार पक्षाच्या वतीने सहायक जिल्हा सरकारी वकिल मंगला पांडे यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...