आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार:मेडीकलमध्ये 90 इंजेक्शनचे आले पार्सल; मेडीकलवाले म्हणतात, आमची ऑर्डरच नाही; डॉक्टर म्हणतात, पार्सल आमचे नाही

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात रॅकेट सक्रिय?, पोलिसांकडून तपास सुरू

कोविड-१९ या आजारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या पाच आरोपींना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी हिंगमिरे यांनी २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अकोला एलसीबीच्या पथकाने काल छापेमारी करून रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली होती. कोरोना रोगावर उपयोगात येणारे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. उपचाराअभावी नागरिक मरत आहेत. असे असताना रामनगरात या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी माहितीची खातरजमा केल्यानंतर आशिष समाधान मते नामक तरुण हे इंजेक्शन विना कागदपत्र, विना बिलाचे तसे डॉक्टर प्रिस्क्रिप्शनशिवाय विकत असल्याचे कळले.

चार हजारांचे हे इंजेक्शन २५ हजार प्रति इंजेक्शन विकताना हा आरोपी पकडला गेला. याला पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणांत राहुल गजानन बंड (२६) भारती प्लॉट जुने शहर, सचिन हिंमत दामोदर (३०) अशोक नगर अकोट फैल, प्रतिक सुरेश शहा (२९) रामनगर अकोला, अजय राजेश आगरकर (२५) बाळापूर नाका जुने शहर या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. तीन आरोपी औषधी दुकानात कामावर असून, दामोदर हा ओझोन मध्ये तर आगरकर हा देशमुख मल्टी स्पेशालिस्ट येथे काम करतात. या आरोपीकडून पोलिसांनी १ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला यात ३ रेमडेसिवीर इंजेक्शनचा समावेश आहे. पाचही आरोपींना आज न्यायालयात हजर केले होते. सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना सरकारी अभियोक्ता मीनाक्षी बेलसरे व तपास अधिकारी हटवार यांनी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली.

या आरोपीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याची शक्यता असल्या कारणाने काळाबाजार करणाऱ्यांत आणखी काही आरोपी आहेत का ? याच्या शोधासाठी पोलिस कस्टडीची गरज आहे, असे सरकारतर्फे न्यायालयात सांगितलेे होते. अन्न व औषधी प्रशासन विभागातील औषध निरीक्षक संजय मोहनसिंह राठोड यांनी याबाबत तक्रार केली असून, सिव्हील लाइन पोलिस ठाण्यांत या पाचही आरोपीविरुद्ध औषधी व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, औषधे किंमत नियंत्रण अत्यावश्यक वस्तू सेवा अधिनियम या कलमांखाली गुन्हे नोंदवलेे आहेत. यात आरोपी वाढीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चुकीने ते आमच्या मेडीकलवर आले
मला सीटी लँड कुरीअरमधून पार्सल आले. ते माझ्या माणसांनी उघडले तर त्यात रेमडेसीवीर इंजेक्शन होते. ते मी बोलावले नाही. त्याचा माझ्याशी संबंध नसल्याने मी ड्रग ऑफिसरकडे दिले. त्यावर अॅड्रेस नाही, एकाच ठिकाणी ९० व्हावेल भेटणे म्हणजे यात काळा बाजार आहे. नितीन दांदळे, तिरुपती बालाजी मेडीकल

चौकशीसाठी डॉक्टरला घेतले ताब्यात
रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी शनिवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांनी सिव्हील लाइन्स चौकातील एका हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. या ठिकाणाहून अनेक कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली.तसेच एका डॉक्टरला सुद्धा चौकशीसाठी रात्री उशिरा ताब्यात घेतल्याची माहिती आहे. यासंदर्भात पोलिसांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

नागपूरहून आले पार्सल
इंजेक्शनचे हे पार्सल नागपूरहून आल्याचे समोर आले. मात्र त्यावर बालाजी मेडीकलचा पत्ता असतानाही हे पार्सल आमचे नाही, असे असले तरी या इंजेक्शनसाठी दोन ते अडीच लाख रुपये मोजण्यात आले. ते पैसे कुणी दिले आणि एवढी मोठी चूक डिस्ट्रीब्युटरकडून कशी काय होऊ शकते, हा प्रश्नच आहे.

पैसे कुणी भरले त्यानंतरच कळेल
इंजेक्शनसाठी अडीच लाख रुपये भरण्यात आले होते. त्यानंतरच त्याची डिलेव्हरी झाली. आता आम्ही हा तपास करीत आहोत की, कुणाच्या अकाऊंटमधून पैसे देण्यात आले आणि इंजेक्शन कुणासाठी पाठवण्यात आले हे नंतरच कळेल. सध्या आम्ही इंजेक्शन जप्त केले आहेत. संजय राठोड,निरीक्षक,औषध विभाग.

बातम्या आणखी आहेत...