आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हे शाखेची कारवाई:रेमडेसिविरचा काळा बाजार; दीड हजाराचे एक इंजेक्शन विकत होते 25 हजाराला!; चार जण पोलिसांच्या जाळ्यात

अकोला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘रेमडेसिविर’चा काळा बाजार करणाऱ्या आरोपींना घेऊन जाताना पोलिस

रेमडेसिविरचा काळा बाजार करत असल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. दीड हजार रुपयांत विकल्या जाणारे एक इंजेक्शन २५ हजार रुपयांमध्ये ब्लॅकने विकताना पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले.कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्ह्यात रेमडेसिविरची मागणी वाढत आहे. मागणीच्या तुलनेत रेमडेसिविरचा पुरवठा कमी होत असल्याने जिल्ह्यात या इन्जेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. याच संधीचा लाभ घेत काही लोक रेमडेसिविरचा काळा बाजार करत असल्याचा प्रकार शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून उघडकीस आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत शुक्रवारी तीन रेमडेसिविर इंजेक्शनसह चार जणांना ताब्यात घेतले.

कोविड उपचारासाठी उपयुक्त असलेल्या रेमडेसिविर इन्जेक्शनचा जिल्ह्यात काळा बाजार सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी पोलिसांनी शहरात सापळा रचून रुग्णाचा बनावट नातेवाईक म्हणून संबंधित व्यक्तीला रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी केली. दरम्यान २५ हजार रुपयांना एक, या प्रमाणे ७५ हजार रुपयांत तीन रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन देणार असल्याचे आरोपीने सांगितले. शुक्रवारी ठरलेल्या वेळेत ठरलेल्या जागेत आरोपीने ७५ हजार रुपयांना तीन रेमडेसिविर आणून दिले. दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले. या प्रकरणाची पोलिस चौकशी करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ व त्यांच्या पथकाने केली.

धक्कादायक : कोविडची सर्व लक्षणे मात्र रिपोर्ट निगेटिव्ह
जिल्ह्यातील अनेक रुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी अशी कोरोनाची लक्षण आहेत. मात्र त्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना निगेटिव्ह असल्याची निरीक्षणे वैद्यकीय तज्ज्ञांकडून नोंदवली जात आहेत. लक्षणे असूनही निगेटिव्ह अहवाल असणाऱ्यांसाठी सर्वोपचारमध्ये कोरोनाचे उपचार केले जात असल्याची माहिती जीएमसीकडून दिली जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून गंभीर अवस्थेत दाखल होणाऱ्या रुग्णांमुळे वैद्यकीय यंत्रणेवर कमालीचा ताण दिसून येत आहे. अशातच आता कोरोनाची सर्व लक्षणे असूनही वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. असे अहवाल हे संसर्ग वाढीसाठी धोक्याचे असून अहवाल निगेटिव्ह उर्वरित.पान

व्हायरल लोड कमी असतो
काही रुग्णांमध्ये व्हायरल लोड फार कमी असतो. त्यामुळे सर्व लक्षणे असूनही टेस्ट निगेटिव्ह येण्याची शक्यता असते. अशा रुग्णांची ७२ तासानंतर पुन्हा चाचणी करण्यात येते. - डॉ. श्यामकुमार सिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी अकोला

‘श्रीराम मेडिकल’मध्ये काम करतो आरोपी
पोलिसांनी रतनलाल प्लॉट चौकात सापळा रचला. यावेळी ज्याच्याकडून इंजेक्शन घ्यायचे होते त्याला बोलावले. पंचवीस हजार रुपयाला एक इंजेक्शन घ्यायचे ठरले. त्यानुसार तीन इंजेक्शन ७५ हजार रुपयात घेतले व पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. तो आरोपी रतनलाल प्लॉट चौकातील ‘ऑर्बिट’ हॉस्पिटल नजीक असलेल्या श्रीराम मेडिकल स्टोअर्स मध्ये काम करतो. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीने याच मेडिकल मधून इंजेक्शन जरी आणले असले तरी त्या मेडिकलला इंजेक्शन ठेवण्याचा परवाना नाही म्हणून हे इंजेक्शन जर त्या मेडिकल मध्ये असतील तर त्या मेडिकलमध्ये आले कुठून याचा पोलिस तपास करीत आहेत.

फॉल्स निगेटिव्ह १५ ते २० टक्के
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. मात्र वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आहे अशांना फॉल्स निगेटिव्ह असे म्हणतात. फॉल्स निगेटिव्ह रुग्ण हे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये आढळत असून त्याचे प्रमाण १५ ते २० टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...