आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला महापालिकेची योजना:जून महिन्यात चालू मालमत्ता कर भरल्यास मिळणार 5% सूट; थकबाकीदीरांना दिलासा नाही

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या वतीने 2022-23 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराचा भरणा 30 जूनपर्यंत केल्यास सामान्य करात 5 टक्के सूट दिली जाणार आहे. ज्या नागरिकांकडे मालमत्ता कर थकीत आहे. अशा थकीत करावर कोणत्याही प्रकारची सूट प्रशासनाने दिलेली नाही. दरम्यान थकीत करासह चालू आर्थिक वर्षाचा कराचा भरणा नागरिकांनी करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत

महापालिकेचा मालमत्ता कर हा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. महापालिकेला 121 कोटी 85 लाख रुपये थकीत, तर चालू आर्थिक वर्षातील 79 कोटी 90 लाख असा 201 कोटी 75 लाख रुपये कर वसूल करावा लागणार आहे. मोठ्या प्रमाणात कर वसुली झाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विकास कामांवर महापालिकेला पैसा खर्च करता येतो.

व्याजाची आकारणी करता येणार

नियमानुसार महापालिकेला थकीत करावर महिन्याकाठी 2 टक्केनुसार व्याजाची आकारणी करता येते. यानुसार ज्या व्यक्तीकडे एक वर्षाचा कर थकीत असेल त्या व्यक्तीला 24 टक्के नुसार व्याजाचा भरणा करावा लागणार आहे. ज्या प्रमाणे थकीत करावर व्याज आकारण्यात येईल, त्याच प्रमाणे चालु आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात मालमत्ता कराचा भरणा केल्यास सामान्य करात सूट दिली जाते.

पावतीची वाट पाहू नका

सामान्य करात सूट मिळण्याचा हा अखेरचा महिना आहे. एप्रिल महिन्यात कराचा भरणा करणाऱ्यांना सामान्य करात मे महिन्यात 7 तर आता 30 जूनपर्यंत चालू आर्थिक वर्षातील कराचा भरणा केल्यास 5 टक्के सूट दिली जाणार आहे. परंतु या कर सुटीबाबत महापालिकेकडून नागरिकांना फारशी माहिती दिली जात नाही. त्यामुळे अनेक नागरिक या योजनेपासून वंचित राहिले आहेत. दरम्यान मालमत्ता धारकांनी कराची पावती मिळण्याची वाट न पाहता, क्षेत्रीय कार्यालय अथवा महापालिकेच्या मुख्य कार्यालयात येऊन चालू आर्थिक वर्षाच्या कराचा भरणा करावा, असे आवाहन मालमत्ता कर विभागाने केले आहे.

अशी दिली आहे सूट

एकूण मालमत्ता करात सामान्य कर हा 30 टक्के आकारला जातो. जे नागरिक चालू आर्थिक वर्षाचा कराचा भरणा 30 जूनपर्यंत करतील त्यांना पाच टक्के सूट दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...