आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादंगलखाेरांनी साेबत दगड अाणले होते. हातात शस्त्रे होती. फटाके फाेडत इंधनाचे कापडी बाेळे फेकले. मुख्य दाराला लाथा मारल्या.. घराच्या मागील बाजूने घुसण्याचा प्रयत्न केला... मात्र, सुदैवाने यश आले नाही... आम्ही दार बंद करूनच बसलाे... खिडकीच्या फटीतून डाेकावून बाहेर पाहिल्यानंतर बाहेरील हिंसेने थरकाप उडला... अशा शब्दांत जुने शहरातील दंगलग्रस्तांनी अापबीती सांगितली. दंगलखाेरांनी निर्माण केलेली दहशत सांगतांना त्यांच्या डोळ्यात प्रचंड भीती दिसून येत हाेती.
जुने शहरातील पाेळा चाैक, हरिहर पेठ, गाडगेनगर या भागात दंगल पीडितांच्या म्हणण्यानुसार दंगलखाेर जुने शहर पाेलिस स्टेशनकडून हरीपेठकडे जात हाेते. त्यांनी आमच्या घरांवर जाेरात दगडफेक केली. दगडं त्यांनी साेबत एका माेठ्या पिशवीत आणले हाेते. हातात धारदार शस्त्र, पाइप हाेते. घरांवर दगडफेक केली. खिडक्यांच्या काचा फुटल्या. दगड घरातही अाले. घरातील साहित्याचे नुकसान झाले. आमच्या घराबाहेरील वाहने पेटवून देण्यात अाली. वाहनांची ताेडफाेड केली, असेही काहींनी सांगितले. पाच जणांनी आपली अापबिती सांगितली.
फटाके आडवे करून फाेडले
दंगलखाेरांनी साेबत फटाक्यांचे बाॅक्स आणले हाेते. बाॅक्समध्ये ५० ते ७० फटाके हाेते. एरवी बाॅक्स उभा करण्यात येताे अाणि फटाका अाकाशाकडे करून फोडतात. मात्र समाजकंटांनी हा बाॅक्स अाडावा केला हाेता. त्यामुळे फटाके घरांच्या आणि वाहनांच्या दिशेने उडून फुटत होते. उडणाऱ्या फटाक्यांच्या िदशेने दंगलखाेर इंधनाने अाेले केलेले कापडी बाेळे करून भिरकवत हाेते. जेणेवरून अाग लागून माेठी हानी हाेईल, असे काहींनी सांगितले.
साेबत इंधनाच्या कॅन होत्या
दंगलखाेरांच्या साेबत इंधनाच्या कॅन होत्या, असेही एका युवकाने सांगितले. वाहनांवर इंधन टाकून पेटवून देण्यात येत हाेते. वाहनाने पेट घेतल्यानंतर पेट्रोल टँकमधील इंधनाने वाहनाला लागलेली अाग अाणखीच भडकत हाेती. परिणामी काही मिनिटांतच वाहन खाक हाेत हाेते, असेही युवक म्हणाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.