आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुल्या जागेतील अनधिकृत शाळेची इमारत पाडली:न्यायालयाच्या आदेशानंतर अकोला महापालिकेच्या पथकाची कारवाई

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरक्षण मार्गालगत हरीश-अश्विन कॉलनीतील खुल्या जागेत (ओपन स्पेस) बांधण्यात आलेली अनधिकृत शाळा न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेच्या पथकाने सोमवारी 5 डिसेंबर रोजी जमिनदोस्त केली.

हरीश अश्विनी कॉलनी मधील रहिवासी करिता असलेला खुला भूखंड सर्वे न. 26/2 मौजे मलकापूर यावर विदर्भ ग्रामीण शिक्षण संस्था यांनी अतिक्रमण करून अनधिकृत रित्या शाळा व महाविद्यालयाचे बांधकाम केले. याबाबत स्थानिक रहिवाशांनी 1992 मध्ये न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाने 31 जानेवारी 2013 रोजी अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. परंतु विदर्भ ग्रामिण शिक्षण संस्थेने स्टे मिळवून जिल्हा न्यायालयात अपिले केले.

न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्या नंतर 11 नोव्हेंबर 2022 रोजी न्यायालयाने 2013 चा न्यायालय कनिष्ठ स्तर अकोला यांचा निर्णय कायम ठेवून संपूर्ण अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम पाडण्याचा आदेश दिला. या अनुषंगाने परिसरातील स्थानिक रहिवासी डॉ. प्रफुल्ल काळे,ॲड.शेषराव लांडे,डॉ. कृष्णराव वानखडे,रवी वैराळे,नंदकिशोर चतरकर,डॉ. देवेंद्र कोल्हे , चेतन ढोरे, प्राध्यापक ज्ञानसागर भोकरे, संदीप पाटील,डॉ. नितीन गायकवाड,निलेश निकम, प्रशांत देशमुख, सुहास पातूर्दे, निखिल काठीवाले, राजेश शिंदे आदींनी महापालिका आयुक्तांना निवेदन देवून न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बांधकाम पाडण्याची कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच हा खुला भूखंड कायदेशीर रित्या मनपाणे ताब्यात घेऊन स्थानिक परिसरातील जनतेला,आबालवृद्ध व बाल गोपाल यांना खेळण्याकरिता व सर्वांगीण विकासाकरिता खुला करण्यात यावा अशी मागणी देखिल केली होती.

या नंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संस्थेला जागा रिकामी करण्याची सुचना केली होती. मात्र बांधकाम न पाडल्याने अखेर महापालिकेने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त केले.

ही कारवाई सहाय्यक नगररचनाकार संदीप गावंडे, दक्षिण झोन क्षेत्रीय अधिकारी देविदास निकाळजे, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, सहा.नगररचनाकार राजेंद्र टापरे, दक्षिण झोन सहा. अतिक्रमण अधिकारी प्रशांत बोळे, कनिष्‍ठ अभियंता प्रतीक कटियारमल व अतिक्रमण विभागाचे सुरक्षा रक्षक रूपेश इंगळे, वैभव कवाळे, सै.रफीक, योगेश कंचनपुरे, स्‍वप्‍नील शिंदखेडकर, गुलाम मुस्‍तफा, अब्‍दुल रज्‍जाक, स्‍वप्‍नील पवार, धिरज पवार, पवन चव्‍हाण, सोनु गायकवाड व अभिकर्ता चे अजिंक्‍य खाडे, नागेश हिरोळे, विशाल खंडारे, हरिश बोंडे, सागर भागवत, प्रशांत झाडे, सुरज लोंढ, नितिन सोनोने आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...