आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र शासनाच्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पाणी पुरवठा योजनेच्या ७३८.४८ कोटी रुपयाच्या प्रस्तावाला मंगळवार दि. १४ मार्च रोजी झालेल्या राज्य तांत्रिक समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव सुकाणू समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच रकमेत वाढ झाल्या बाबतचा खुलासाही समितीने मागीतला. परिणामी हा खुलासाही महापालिकेला करावा लागणार आहे.
मजिप्राने पाणी पुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी दिल्या अमृत योजनेच्या राज्य तांत्रिक समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली. पाणी पुरवठा टप्पा दोनचा प्रस्ताव समितीकडे दाखल करताना २२५ कोटी रुपये खर्चाचा दर्शविण्यात आला होता. मात्र नंतर हा प्रस्ताव रिवाईज झाल्याने प्रस्तावाच्या किमतीत वाढ झाली. परंतु समितीने हा प्रस्ताव २२५ कोटी रुपयाचा गृहित धरला होता. त्यामुळेच समितीने खर्चात वाढ होण्याचे नेमके कारण काय? याचा खुलासा मागीतला असून आता हा प्रस्ताव सुकाणू समितीकडे पाठविण्यात आला आहे.
३०० कोटी रुपयाच्या आत खर्च असता तर हा प्रस्ताव सुकाणू समितीकडे पाठविण्याची गरज नव्हती. मात्र आता सुकाण्ू समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्या नंतरच या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी मिळेल. त्यामुळे योजनेच्या कामाचा मार्ग मोकळा होईल.
योजनेत टाकावा लागेल ३० टक्के हिस्सा
या योजनेला केंद्र शासनाकडून ५० टक्के निधी दिला जाणार असून राज्य शासनाकडून २० आणि३० टक्के निधी महापालिकेला वळता करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेला २२० कोटी रुपयाची व्यवस्था करावी लागणार आहे. २२० कोटी रुपयाचा निधी या योजनेत वळता करणे महापालिकेसमोर आव्हान ठरणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.