आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोल्यामध्ये शनिवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामध्ये शिवणी माल धक्क्यावरील युरिया आणि सिमेंट पावसात भिजून खराब झालेले आहे. यामध्ये व्यापाऱ्यांचे करोडोचे नुकसान झाल्याचा दावा अकोला व्यापारी असो.कडून करण्यात आला आहे.
अकोला रेल्वे स्टेशन येथून चार वर्षांपूर्वी मालवाहतूकीचा धक्का शिवणी रेल्वे स्टेशन येथे हस्तांतरित करण्यात आला. तेव्हापासून अकोल्यामध्ये येणारा व्यापारी वर्गाचा संपूर्ण माल शिवणी येथे उतरवला जातो. सुरुवातीपासूनच येथील प्लॅटफॉर्मवर येथे शेड उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप शेडचे काम झाले नाही. एक वर्षापूर्वी व्यापारी वर्गाने पिपिपी तत्वावर शेड उभारण्याचे निवेदन रेल्वे विभागाकडे दिले होते. ज्यामध्ये रेल्वे शेडसाठी जागा आणि व्यापारी असो. शेड उभारणार होतो. मात्र, यावर कुठलिच कारवाई झाली नाही.
दरम्यान शनिवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे काही वेळापूर्वीच फलाटावर उतरविण्यात आलेला युरिया आणि सिमेंट पावसामध्ये भिजले. यात व्यापारी वर्गाचे जवळपास ४ कोटीचे नुकसान झाल्याचे असो.कडून सांगण्यात येत आहे. रेल्वे विभागाच्या अधिकारी वर्गाकडून रविवारी नुकसानिची पाहणी केली. मात्र, नुकसानिची जबाबदारी व्यापारी वर्ग रेल्वे प्रशासनावर तर रेल्वे अधिकारी संबंधी ठेकेदारावर ढकलत असल्याचे समजते.
आ. सावरकर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे मांडली समस्या
आ. रणधीर सावरकर यांनी राज्यसभा निवडणूकी संबंधाने मुंबई येथे आलेल्या केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांच्याकडे शिवणी रेल्वे स्टेशन येथील शेड उभारणीची समस्या रविवारी मांडली. यावेळी त्यांनी लवकरच यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.