आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापवित्र समजल्या जाणाऱ्या शिक्षणक्षेत्राला काळीमा फासणारी आणि शरमेने मान खाली घालायला लावणारी धक्कादायक घटना बार्शीटाकळी तालुक्यातील धामणदरी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली. येथील दोन शिक्षकांनी चौथीत शिकणाऱ्या चार विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी शिक्षकांना तत्काळ अटक करण्यात आली आहे.
यांना झाली अटक
शिक्षक राजेश रामभाऊ तायडे (वय 45), सुधाकर रामदास ढगे (वय 53) दोघेही राहणार अकोला असे संशयित आरोपी शिक्षकांची नावे आहेत. धामणदरी येथे जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेची पटसंख्याच 9 आहे. या 9 विद्यार्थांसाठी 2 शिक्षक आहेत. 8 ते 10 वर्षाच्या चार मुली या शाळेत शिकण्यासाठी येत असत.
'त्या' शिक्षकांची नियत फिरली!
मुलांना शाळेत सोडून पालक निर्धास्तपणे आपली शेतीची कामे करण्यासाठी जातात. शाळेसारखी दुसरी सुरक्षित जागा नाही म्हणून कुण्याही पालकांच्या मनात शिक्षकांविषयी वेगळ्या भावना असण्याचे कारण नाही. हाच विश्वास ठेऊन पालक आपल्या मुलींना शाळेत घालायचे. मात्र नियत फिरलेल्या नराधम शिक्षकांची वाईट नजर या मुलींवर पडली. गत दोन महिन्यांपासून या विद्यार्थिनीसोबत दोन्ही शिक्षक अश्लील चाळे करायचे. इतकेच नव्हे तर मुलींना एकटे पाहून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचे.
धक्कादायक:अकोल्यात अंध महिलेवर पतीसमोरच बलात्कार; रस्ता विचारताच निर्जनस्थळी नेऊन कृत्य, आरोपीला बेड्या
दृष्टीबाधित दाम्पत्य रात्री उशिरा अमरावतीहून अकोल्यात आले असता त्यांनी बसस्थानकाबाहेर जाण्याचा रस्ता विचारला, मात्र रस्ता दाखवण्याचा बहाना करीत निर्जनस्थळी नेत महिलेवर बलात्कार केला. गंभीर बाब म्हणजे हे कृत्य त्याने तिच्या पतीसमोरच केले.
मुली भयभीत
वारंवार घडणाऱ्या या कृत्यामुळे अल्पवयीन मुली भयभीत झाल्या. त्यापैकी एक दोघी शाळेत जाण्यासाठी घाबरत होत्या. पीडित मुलींपैकी एकही मुलगी शाळेत गेली नाही. घरीच थांबल्या असता, पालकांनी त्यांना शाळेत का जात नाही म्हणून विचारले असता चौघींपैकी एकीने वारंवार घडत असलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर या शिक्षकांचे बिंग फुटले. पालकांनी बार्शीटाकळी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असता ठाणेदार संजय सोळंके यांनी तत्काळ दोन्ही शिक्षकांना पोलिस ठाण्यात आणले आणि पीडित मुलींच्या तक्रारीवरून त्यांना अटक केली. या शिक्षकांविरूद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
कोर्टात हजर करणार
दोन्ही शिक्षकांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे पोलिस अधीक्षकांनी सोपवला आहे. दोन्ही शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरू केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.