आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा कार्यालयात शिवसेनेचा ठिय्या:कचरा गाडीची मागणीसाठी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलाचा इशारा

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध प्रभागात नालीतून काढलेला कचरा उचलण्यासाठी असलेल्या दोन चाकी गाड्यांची दुरवस्था झाली आहे. चार महिन्यापासून या गाड्यांची मागणी करूनही गाड्या उपलब्ध न झाल्याने शुक्रवार दि. 6 जानेवारी रोजी शिवसेना (उध्द‍व ठाकरे गट) च्या वतीने महापालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात आले.

प्रभागातील नाल्यांची साफ - सफाई केल्यानंतर नालीतून काढलेला कचरा दोन चाकी गाडीत टाकून ट्रॅक्टरमध्ये टाकला जातो, मात्र या दोन चाकी गाड्या जीर्ण झाल्यााने या गाड्यांचा वापर करता येत नाही त्यामुळे नाली साफ केल्या, नंतर नालीतील काढलेली घाण रस्तालगत पडलेली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळेच शिवसेना (उध्दाव ठाकरे गट) च्या वतीने महापालिकेतील अधिकाऱ्यांना तसेच आरोग्य विभागाला दोन चाकी गाड्या पुरवण्याची मागणी केली. या अनुषंगाने चार महिन्यात चार पत्र देऊनही दोन चाकी गाड्या प्रशासनकडून पुरवता आल्या नाही. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उध्द्व ठाकरे गटचे) अकोला पश्चिम प्रमुख राजेश मिश्रा, अकोला पुर्व प्रमुख अतुल पवनीकर यांच्या नेतृत्वात महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवसेना जिंदाबाद, हे पाप कोणाचे, भारतीय जनता पार्टीचे, जय भवानी - जय शिवाजी अशा घोषणा देऊन महापालिका कार्यालय परिसर निनादून सोडला.

या ठिय्या आंदोलनात माजी नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, मंजुषा शेळके, अनिता मिश्रा, सुनिल दुर्गिया, रोशन राज, गजानन बोराळे, अनिल परचुरे, रूपेश ढोरे, छोटू दुर्वे, दीपक पांडे, लक्ष्मण पंजाबी, गणेश बुंदेले, अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

अन्यथा तीव्र आंदोलन करू

महापालिका सक्तीने मालमत्ताच कर वसुली करीत आहे, सील लावण्याची कारवाई देखील सुरू आहे, मात्र सोई-सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. दोन चाकी गाड्या सात दिवसात उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

- राजेश मिश्रा, अकोला पश्चिम प्रमुख.

बातम्या आणखी आहेत...