आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला मनपाची अतिक्रमण हटाव मोहिम:जुन्या धान्य बाजारातील 101 दुकाने जमीनदोस्त; सकाळी साडेसहाला सुरू केली कारवाई

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या मध्यवर्ती भागातील जुना धान्य बाजारातील जागेवर अतिक्रमण केलेल्या 87+14 दुकाने महापालिका अतिक्रमण विभागाने आज सकाळी जमीनदोस्त केली.

नझुल शिट क्रमांक 39 बी, भुखंड क्रमांक 12, 54/1 आठ हजार 911 चौरस फुट जागा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. ही जागा महसुल विभागाच्या मालकीची आहे. ही जागा 1980 मध्ये लघु व्यवसायीकांना दैनंदिन शुल्क आकारण्याच्या पद्धतीने देण्यात आली होती. या जागेवर कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र 20 रुपये रोज यानुसार भाड्याने घेतलेल्या या जागेवर अनेकांनी पक्के बांधकाम केले.

या अनुषंगाने महापालिकेच्या पथकाने 4 नोव्हेंबर रोजी कारवाई सुरु केली होती. व्यावसायीकांनी साहित्य काढण्यास वेळ मागीतला. प्रशासनाने आठ दिवसाचा कालावधी दिला. त्यानंतर पथकाने कारवाईसाठी 28 नोव्हेंबरचा दिवस निवडला. मात्र दहा दुकाने पाडल्या नंतर ही कारवाई थांबविण्यात आली होती. दरम्यान प्रशासनाने या व्यावसायीकांना सात दिवसाची मुदत दिली होती. ही मुदत संपुष्टात आल्याने 2 जानेवारी 2023 रोजी धडक कारवाई केली जाणार होती.आहे. मात्र यापूर्वीच शासनाचे पत्र आल्याने कारवाई केली नाही. आता कारवाई टळणार असे वाटत असताना बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली.

अनेक दुकानात होता माल

अनेक व्यावसायिकांना कारवाईची शक्यता वाटत होती त्यामुळे त्यांनी आपले साहित्य काढून घेतले. मात्र अनेक व्यवसायिक कारवाई होणार नाही या भ्रमात राहिल्याने त्यामुळे अनेक दुकानातील मालाचे नुकसान झाले.ही कारवाई जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी विठ्ठल देवकते, अतिक्रमण अधिकारी चंद्रशेखर इंगळे, प्रविण मिश्रा, नगर रचना विभागाचे राजेंद्र टापरे आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...