आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला येथील डॉ. अंजली राजेंद्र सोनोने आणि सुरेखा दिलीप सोनोने या एकाच कुटुंबातील दोन साठीतील महिलांनी जगातील अतिशय खडतर, धोकादायक अशा ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ची गिर्यारोहणाची खडतर मोहीम ३ मे रोजी यशस्वीरित्या पूर्ण करून अकोल्याच्या गिर्यारोहण मोहिमेत एक नवा इतिहास रचला.
दोघींसोबत डॉ. राजेंद्र सोनोने यांनीसुद्धा या गिर्यारोहणाच्या मोहिमेत भाग घेतल्याने एकाच कुटुंबातील तिघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करण्याची ही अकोलेकरांसाठी प्रथमच वेळ आहे.
ऐतिहासिक क्षणात केले सहभागी
विशेष म्हणजे, एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करतानाचा प्रसंग त्यांनी फेसबुकवर लाइव्ह दाखवून सर्व मित्रमंडळींना ह्या ऐतिहासिक क्षणाच्या आनंदात सहभागी केले. या या दोघींनी ही मोहीम २६ एप्रिल रोजी लुक्ला ह्या नेपाळमधील हिमालयाच्या अत्यंत दुर्गम भागातील गावातून सुरू केली होती. लुक्ला, फाकडींग, नामचे बजार, तेंगबोचे, देबोचे, फेरीचे, दिंगबोचे, लोबुचे, गोरखशेप, काला पत्थर असे खडतर गिर्यारोहण मजल दरमजल करीत ३ मे रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्पला ही त्रयी यशस्वीरीत्या पोहोचली.
चहोबाजूंनी बर्फच बर्फ
एव्हरेस्ट बेस कॅम्प हा समुद्रसपाटीपासून ५३६४ मीटर एवढ्या उंचीवर आहे. जेथे वर्षभर चोहोबाजूंनी बर्फच बर्फ असून उणे २० डिग्री सेल्सिअस तापमान असते. पण न डगमगता, हिमतीने त्यांनी प्रसंगी सतत कोसळणाऱ्या पावसात आणि सतत होणाऱ्या हिमवर्षावात, उणे २० डिग्री तापमानातही आपली मोहिम ८ दिवसांत यशस्वीरित्या फत्ते केली आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प वर तिरंगा मोठ्या दिमाखात फडकवला.
पाठीवर १० ते १५ किलोचे ओझे घेवून दररोज १० ते १२ तास हिमालय चढत जाण्याचे दिव्य या तिघांनी वयाच्या साठीत असताना करून तरूण पिढीला एक मोठा आदर्श घालून दिला. विशेष बाब म्हणजे ही मोहीम त्यांनी स्वतःहून आखली.
आयुष्यातला पहिला ट्रेक
विशेष म्हणजे डॉ. अंजली आणि सुरेखा यांचा हा आयुष्यातील पहिला ट्रेक असूनसुद्धा त्यांनी दृढ निश्चयाने तो यशस्वी रित्या पूर्ण केला. डॉ. राजेंद्र सोनोने हे अकोला जिल्ह्यातील पहिले फक्त आयर्न मॅनच नसुन एव्हरेस्ट बेस कॅम्प पेक्षा ३०० मीटर अधिक उंचावर असलेल्या लेह येथील खरदुंगला पास सायकलने सर करणारे पहिले सायकलस्वार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.