आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला:कोरोनाग्रस्ताचा खून? रुग्णालयातील बाथरुममध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला, उपाचारादरम्यान मृत्यू

अकोला3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 7 एप्रिलला रुग्णालयात दाखल, आता रुग्णालयाच्या बाथरुममध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला

जगभरात कोरोनाची दहशत पसरली असताना अकोल्यात एका कोरोनाग्रस्ताचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. प्राथमिकदृष्ट्या हे प्रकरण खून असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णाला काही दिवसांपूर्वीच कोरोनाग्रस्त म्हणून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू करून कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. हा रिपोर्ट आल्याच्या अवघ्या काही तासानंतर हा रुग्ण गळा चिरलेल्या आणि रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयाच्याच बाथरुममध्ये सापडला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा रुग्ण आसाम येथील रहिवासी आहे. तो या ठिकाणी कसा आला याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. यासोबत काही अधिकारी या घटनेला आत्महत्या देखील म्हणत आहेत.

7 एप्रिलला रुग्णालयात दाखल, 10 तारखेल रिपोर्ट पॉझिटिव्ह 11 तारखेला मृत्यू

याबाबत सविस्तर वृत्त असे की 30 वर्षीय कोरोना संशयित व्यक्तीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शासकीय वैद्यकीय अहवालाने त्याच्या स्वॅबचे नमुणे तपासणीसाठी पाठवले होते. 10 एप्रिल रोजी अर्थात शुक्रवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याच घटनेच्या अवघ्या काही तासानंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास हा रुग्ण रुग्णालयाच्या बाथरुममध्ये रक्तबंबाळ अवस्थेत सापडला. त्याचा गळा चिरलेला होता. रुग्णालय स्टाफला ही गोष्ट निदर्शनास येताच त्यांनी त्याच्या शस्त्रक्रिया केली. परंतु, उपचार सुरू असतानाच सकाळी 10 वाजता संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी दिली आहे. दरम्यान, पोलिस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...