आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेपुढे आव्हान:मालमत्ता कराची 102 कोटी रुपयांची वसुली थकली; आता करावर दरमहा 2% नुसार आकारणार व्याज

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेसमोर 102 कोटी रुपयाच्या थकीत मालमत्ता कर वसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान 1 डिसेंबरला रोजी अभय योजना संपुष्टात आल्याने आता थकीत मालमत्ता करावर दरमहा दोन टक्के यानुसार व्याज आकारणी केली जाईल.

महापालिकेसमोर चालु आर्थिक वर्षात 122 कोटी 18 लाख रुपये थकीत मालमत्ता कर तसेच 2022-23 या वर्षातील 79 कोटी 55 लाख रुपयाचा मालमत्ता कर असा एकूण 201 कोटी 47 लाख रुपयाच्या मालमत्ता कर वसुलीचे आव्हान होते. महापालिकेला नियमानुसार थकीत मालमत्ता करावर दरमहा दोन टक्के यानुसार व्याज आकारण्याचा अधिकार आहे. त्यामुळे वर्षाकाठी 24 टक्के व्याज आकारले जाते. या व्याजाचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसु नये, यासाठी 2021-22 या आर्थिक वर्षात अभय योजना राबविण्यात आली. यामुळे ज्या नागरिकांकडे मालमत्ता कर थकीत आहे, त्यांना व्याजाचा भूर्दुंड बसणार नाही. या योजनेला वारंवार मुदतवाढ देण्यात आली.

2022-23 या आर्थिक वर्षातही ही योजना जुन महिन्यापर्यंत राबविण्यात आली. मात्र त्यानंतर ही अभय योजना बंद करण्यात आली. दरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी अभय योजना पुन्हा सुरु करावी अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा दिला. या नंतर प्रशासनाने ही योजना 30 नोव्हेंबरपर्यंत राबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एक महिना थकीत कराचा भरणा करण्यास मिळाला. मात्र आता अभय योजना संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता थकीत मालमत्ता करावर दरमहा 2 टक्के यानुसार व्याज आकारले जाणार आहे.

महापालिकेला 122 कोटी रुपयाचा थकीत कर वसुल करावा लागणार होता. अभय योजना सुरू करुनही आता पर्यंत केवळ 20 कोटी रुपयाचा थकीत कर वसुल झाला. त्यामुळे अद्यापही 102 कोटी रुपयाचा थकीत कर महापालिकेला वसुल करावा लागणार आहे. तर दुसरीकडे चालु आर्थिक वर्षाचा 79 कोटी 55 लाख रुपयाचा कर वसुल करावा लागणार होता. यापैकी केवळ 23 कोटी रुपयाचा कर वसुल झाल्याने महापालिकेला थकीत व चालु असा एकूण 158 कोटी रुपयाचा कर वसुल करावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...