आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघ प्रथम‎:राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेत अकोला संघ प्रथम‎

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे जिल्ह्यातील‎ दोंडाईचा येथील हस्ती पब्लिक‎ स्कूलमध्ये २९ ते ३० ऑक्टोबर‎ दरम्यान झालेल्या १७ व्या ज्युनिअर‎ रोल बॉल स्पर्धेत मुलांच्या गटात‎ अकोला जिल्हा रोल बॉल‎ असोसिएशन तथा यंग विंग रोल बॉल‎ स्केटींग अॅन्ड फिटनेस क्लब‎ अकोलाच्या संघाने अंतिम सामन्यात‎ पुणे संघास पराभूत करुन प्रथम‎ क्रमांक पटकावला.

विजयी संघामध्ये‎ आराध्य सुरेश गाढवे, ध्रुव ईलेश‎ मेहता, अनिकेत चंद्रकांत काळे,‎ सुबोध वजिय घनबहातूर, देवेद प्रमोद‎ नानोट, पवन गणेश केदार, आर्यन‎ राजेश शिरसाट, आर्यन शैलेश‎ सावरकर, हिमांशु मंगेश महल्ले,‎ अथर्व दिनेश साबळे, अनुराग विलास‎ जाधव, श्लोक मनोज ढोले या‎ खेळाडूंचा समावेश होता. या‎ यशाबद्दल अकोला जिल्हा रोल बॉल‎ असोसिएशनचे अध्यक्ष तथा साने‎ गुरुजी विद्या मंदिरचे अध्यक्ष दिलीप‎ अंधारे, प्राचार्य संजय इंगळे, यंग विंग‎ रोल बॉल स्केटींग अॅन्ड फिटनेस‎ क्लबचे अशोक शिरसाट यांनी‎ अभिनंदन केले आहे. विजयी संघाने‎ आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व‎ प्रशिक्षक अनिकेत शिरसाट यांना‎ दिले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...