आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला दोन दिवसापासून तापमानात वाढ झाली आहे. या वाढत्या तापमानाचा फटका कोणालाही बसु शकतो. ही बाब लक्षात घेवून नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्म उपाय योजना कराव्यात, असे आवाहन महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनुप चौधरी यांनी केले आहे.
वाढत्या तापमानात अधिक फिरल्यास उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीचे कामे फार वेळ करणे, कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा वाढत्या तापमानातील परिस्थितीत सतत संबंध आल्याने उष्माघात होतो.
उष्माघातापासून वाचण्यासाठी हे करा
थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरूत्साही होणे, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे, मानसिक व शारीरीक अस्वस्थतता, बेशुद्धावस्था आदी उष्माघाताची लक्षणे आहेत. यासाठी
1] पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे.
2] घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा, दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळणे, सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा
3] हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवाणे, उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.
4] शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस घेणे किंवा घरी बनलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा, अशक्तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम आदी उन्हाचा फटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
रुग्णांची काळजी घ्या
दरम्यान पशूंच्या बचावासाठी गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. त्यांना पुरेसे पाणी पिण्यास द्यावे, उष्पाघाताची लक्षणे दिसतास रूग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, तिथे पंखे, कुलर ठेवावेत शक्य असल्यास वातानुकुलीत खोलीत ठेवावे, रूग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.
त्याला बर्फाच्या पाण्याने आंघोळ घालावी,त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईस पॅक लावावेत, रूग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास दवाखान्यात उपचारार्थ दाखल करावे, असे आवाहन डॉ.अनुप चौधरी यांनी केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.