आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापदायक:अकोला 43.5° सेल्सियस ; विदर्भात सर्वाधिक तप्त‎, उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक हैराण

अकोला21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला‎ जिल्ह्यात एप्रिलमध्ये गारपिटीसह ‎झालेल्या अवकाळी पावसामुळे ‎घटलेले तापमान मेमध्ये वाढतच‎ असून, बुधवारी १० मे रोजी विदर्भात अकोल्यात सर्वाधिक‎ ४३.५ अंश सेल्सिअस तापमान ‎नोंदवण्यात आले.‎

यंदाच्या उन्हाळ्यात हे सर्वाधिक ‎तापमान अाहे. विदर्भात तिसऱ्यांदा ‎ अकोला सर्वाधिक ‘ताप’दायक‎ म्हणून नोंद झाली अाहे. मात्र‎ गतवर्षी २०२२ मध्ये ४ मे रोजी ४३.५‎ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ‎करण्यात अाली होती.‎

अकोला सर्वाधिक तप्त

एप्रिलच्या अखेरीस जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट‎ झाली होती. परिणामी गारवा निर्माण ‎ ‎ झाला हाेता. तापमान ३५ अंश ‎ ‎ सेल्सिअस पेक्षाही कमी नोंदवण्यात अाले होते.‎ मात्र मे महिन्याच्या पहिल्या‎ आठवड्यात तापमान वाढण्यास‎ सुरूवात झाली. दरम्यान जगातील‎ उष्ण शहर म्हणून अाेळखले जाणारे‎ अकोला बुधवारी सकाळपासूनच‎ तापण्यास सुरुवात झाली. दुपारी १२‎ वाजता नंतर तर उन्हाच्या तीव्र‎ चटक्यांमुळे शरीरावरील त्वचा‎ सोलली जाते की काय, अशी‎ स्थिती होती.‎

विदर्भातील‎ बुधवारचे तापमान‎

विदर्भात काही दिवसांपासून‎ सरासरी तापमानात वाढ होत‎ असून, बुधवारी पुढीलप्रमाणे‎ तपमानाची नोंद केली आहे.‎

शहरकमाल‎
अकोला४३.५‎
अमरावती४१.८‎
बुलढाणा३९.४‎
ब्रम्हपुरी४०.२‎
चंद्रपूर४०.४‎
गडचिरोली४१.६‎
गोंदिया४१.२‎
नागपूर४१.२‎
वर्धा४१.२‎
वाशीम४०.०‎
यवतमाळ४०.५‎

पुन्हा एसी, कुलर सुरू‎

एप्रिलमध्ये तीन वेळा अवकाळी‎ पाऊस झाला हाेता. परिणामी‎ गारवा निर्माण झाल्याने काही‎ दिवस कुलर, एसी बंद करण्यात‎ अाले होते. मात्र एका‎ अाठवड्यापासून तापमान‎ वाढतच असून, आठवडाभरात‎ तापमान ४५ अंशावर जाण्याची‎ शक्यता हवामान‎ अभ्यासकांकडून वर्तवण्यात‎ आली आहे.‎