आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकाेला यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भात अकाेल्यात दुसऱ्यांदा सर्वाधिक ४४.५ अंश सेल्सिअस तापमान नाेंदवले. यंदाच्या उन्हाळ्यात हे सर्वाधिक तापमान आहे. विदर्भात तिसऱ्यांदा अकाेला सर्वाधिक तापदायक म्हणून नाेंद झाली.
मात्र गतवर्षी २०२२ मध्ये ४ मे राेजी ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद केली हाेती. या आठवड्यात ३ मे राेजी अकाेला विदर्भात सर्वात जास्त तापले हाेते.
उन्हाचा चटका वाढला
काही दिवसांपासून वातावरणाच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळाल्या. कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट तर कधी वादळी वारे, यामुळे उन्हाळ्यातही पावसाळा जाणवू लागला होता. मात्र, आता जिल्ह्यात उन्हाचे चटके जास्त जाणवत आहेत. तापमान वाढीमुळे दिवसा बाहेर पडणं कठीण झाले. रस्त्यावरील वर्दळ कमी झाली.
सकाळी ९ वाजतापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. तापमानात वाढ का? अचानक तापमानात एवढी वाढ होण्यामागचे कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात होणारे बदल. गत काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात मोचा वादळ सक्रिय झाले आहे. त्यामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे
विदर्भातील तापमान असे
शहर कमाल अकाेला ४४.५ अमरावती ४२.६ बुलढाणा ४०.६ ब्रम्हपुरी ४१.२ चंद्रपूर ४१.६ गडचिराेली ४०.० गाेंदिया ४२.५ नागपूर ४२.० वर्धा ४३.४ वाशीम ४०.० यवतमाळ ४२.५
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.