आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराच्या मध्यवर्ती भागातील जुना धान्य बाजारातील जागेवर अतिक्रमण केलेल्या 87 दुकानांवरील 2 जानेवारी रोजी होणारी कारवाई शासनाच्या पत्रामुळे लांबणीवर पडली आहे. यामुळे या भागातील व्यावसायीकांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे.
नझुल शिट क्रमांक 39 बी, भुखंड क्रमांक 12, 54/1 आठ हजार 911 चौरस फुट जागा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. ही जागा महसुल विभागाच्या मालकीची आहे. ही जागा 1980 मध्ये लघु व्यवसायीकांना दैनंदिन शुल्क आकारण्याच्या पद्धतीने देण्यात आली होती. या जागेवर कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र 20 रुपये रोज यानुसार भाड्याने घेतलेल्या या जागेवर अनेकांनी पक्के बांधकाम केले. या अनुषंगाने महापालिकेच्या पथकाने 4 नोव्हेंबर रोजी कारवाई सुरु केली होती. व्यावसायीकांनी साहित्य काढण्यास वेळ मागीतला. प्रशासनाने आठ दिवसाचा कालावधी दिला. त्यानंतर पथकाने कारवाईसाठी 28 नोव्हेंबरचा दिवस निवडला. मात्र दहा दुकाने पाडल्या नंतर ही कारवाई थांबविण्यात आली होती. दरम्यान प्रशासनाने या व्यावसायीकांना सात दिवसाची मुदत दिली होती. ही मुदत संपुष्टात आल्याने 2 जानेवारी 2023 रोजी धडक कारवाई केली जाणार होती. महापालिका अतिक्रमण पथकाने तशी तयारी देखिल केली.
मात्र 1 जानेवारी रोजी रविवारी सायंकाळी उशिराने महापालिकेला पत्र मिळाले. शासनाच्या नगर विकास विभागाचे उपसचिवांनी या जागेबाबतचा स्वयंपूर्ण अहवाल 10 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावा, असे पत्र दिले आहे. यामुळे प्रशासनाला ही कारवाई थांबवावी लागली. या पत्रामुळे या जागेवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायीकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
आमदार विप्लव बाजोरीया यांनी नगर विकास विभागाला हे व्यावसायीक 1975 या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या कारवाई स्थगिती द्यावी. ही जागा व्यावसायीकांनी कायम स्वरुपी मिळण्याबाबतची मागणी देखील केली आहे. त्यामुळे कारवाईस स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती. या पत्रावर नगर विकास विभागाने महापालिकेला पत्र देवून या जागेचे प्रकरण तपासून तसा स्वयस्पष्ट अहवाल 10 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.