आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन देशमुखांना जीवे मारण्याची धमकी:धमकावणारा म्हणाला- आम्ही अनेकांना मारून समुद्रात फेकले; तुमचाही तसाच समाचार घेऊ

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोल्यातील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल आहे. याबाबत त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्वत: माहिती दिली आहे. राणे कटुंबाविरोधात बोलल्यामुळे ही धमकी आली आहे असा संशय आमदार देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

नितीन देशमुख म्हणाले?

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख म्हणाले की, आज सकाळी 11.30 ते दुपारी 12 च्या दरम्यान मला दोन वेगवेगळ्या नंबरवरून फोन आले. ​एका अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली, निलेश राणे आणि नितेश राणे यांचे नाव घेऊन मला जीवे मारण्याची धमकी अली आहे. आतापर्यंत मुंबईत अनेक लोकांना समुद्रात मारून फेकून दिले. त्याचा पत्ता लागला नाही.​​​​​​ तुम्ही मुंबईत आल्यानंतर तुमचाही तसाच समाचार घेऊ, अशी धमकी त्यांनी दिली असल्याची प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिली.

यापुढे बोलताना आमदार नितीन देशमुख म्हणाले की, नारायण राणे या, नितेश राणे या, निलेश राणे कुणीही या मी तुमची नरिमन पॉंईट येथे वाट पाहतो असे आव्हान दिले. मात्र, धमकी देणाऱ्याने जो उल्लेख केला त्यावरून असे किती जणांना मारून समुद्रात फेकण्यात आले याची शासनाने चौकशी करावी अशी मागणीही आमदार देशमुख यांनी केली आहे. पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, मी मंगळवारी मुंबईला येत असून तुम्ही नारायण राणे, नितेश राणेंना घेऊन 8 ते 10 दरम्यान नरीमन पॉईंटवर या असे आव्हान मी धमकी देणाऱ्याला दिले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...