आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे अlमदार हरवले, वंचितची टीका करीत अनाेखे आंदोलन:त्यांना शाेधणाऱ्याला 51 रुपयांचे बक्षिस, महादेवालाही साकडे!

अकोला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीग्राम -अकोट मार्ग (मुख्य पुलावरून हाेणारी सर्व प्रकारची वाहतूक) गत सहा महिने बंद असल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडीने रविवारी दुपारी अनाेखे आंदोलन केले. भाजपचे निष्क्रिय आमदार हरवले आहेत, अशी टीका करीत वंचितच्या युवा पदाधिकाऱ्यांनी गांधीग्राम येथे धाव घेतली. त्यांनी हरवलेल्या लाेकप्रतिनिधींना शाेधण्यासाठी महादेवाला साकडे घालत अभिषेक केला. आमदार शोधून आणणाऱ्यास 51 रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली.गांधीग्रामचा पूल नादुरुस्त असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे 12 मार्च राेजी वंचित बहुजन युवा आघाडीने गांधीग्राम येथे अभिनव आंदोलन केले.

गांधीग्राम पुलावरून अकोला- अकोट राेडवरील वाहतूक बंद असून, सामान्य नागरिक, विद्यार्थी, शेतकरी त्रस्त आहेत. मात्र, सहा महिने उलटून देखील त्यावर काहीही उपाययोजना झाली नाही.उलट तात्पुरती पूल करून वाहतूक सुरू करण्याचा दिखाऊपणा आणि त्याचेही श्रेय घेण्याचा प्रकार घडत असल्याची टीका वंचितने केली.

असे केले आंदोलन

  • भाजपचे खा. संजय धोत्रे, अकाेला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, अकाेटचे आमदार प्रकाश भारसाकळे हे निष्क्रिय असून, ते हरवले असल्याची टीका वंचित युवा आघाडीने आंदोलना दरम्यान केली.
  • आंदोलनात युवा कार्यकर्ते हातात भाजपच्या लाेकप्रतिनिधींचे छायाचित्र असलेला फलक घेत सहभागी झाले.
  • हरवलेल्या लाेकप्रतिनिधींना शोधून आणणाऱ्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर बक्षीस देण्यात येईल, असेही फलकावर नमूद करण्यात आले हाेते.
  • पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून साकडे घालण्यात आले.

आंदोलन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. आंदोलनात युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर यांच्यासह समीर पठाण, दादाराव पवार, ॲड. प्रशिक मोरे, उपाध्यक्ष संतोष गवई, नितीन वानखडे, सचिव आनंद खंडारे, आशिष रायबोले, श्रीकृष्ण देवकुणबी,सुजित तेलगोटे, अध्यक्ष जय तायडे, रितेश यादव, वैभव खडसे, नागेश उमाळे, दादू लांडगे,मंगेश सवंग,विजय भटकर,दीपक ठाकूर,विकास सावळे, आकाश गवई, आकाश जंजाळ, निशांत राठोड, नंदकिशोर मापारी, अनंता इंगळे, रामदास वानखडे, अनील वानखडे, निखिल तायडे, दीपक दरोकर, निशांत दारोकर, अमर वानखडे, रंजीत तायडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...