आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलपातळीत घट:अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णात 26.52 तर वान प्रकल्पात 35 दलघमी जलसाठा शिल्लक

अकोला21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिल महिन्यापासून तापमानात सातत्याने वाढ झाल्यानतंर देखील जुनच्या मध्यात जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात 26.52 तर वान प्रकल्पात 35 दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. मात्र अनेक लघु प्रकल्पातही जलपातळीत घट झाली असून पाच लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. पुढे पावसाने दांडी मारल्यास येणारे संकट लक्षात घेवून पाण्याची बचत आवश्यक ठरणार आहे.

नोव्हेंबर अखेर पर्यंत पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मोठे, मध्यम तसेच लघु प्रकल्प ओसंडून वाहिले आहेत. काटेपूर्णा आणि वान या दोन मोठ्या प्रकल्पाचे दरवाजे वारंवार उघडावे लागले होते. तसेच जिल्ह्यातील 36 पैकी जवळपास सर्वच लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते. जिल्ह्यात दोन मोठे, तीन मध्यम आणि 36 लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून अकोला शहरासह विविध गावांची तहान भागवली जाते तसेच हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली येते. त्यामुळे या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा फारसा सामना करावा लागत नसला तरी नासाडी होवू नये, याची खबरदारी घ्यावी, असे मत तज्ज्ञानी व्यक्त केले आहे. .

प्रकल्पातील जलसाठा असा

प्रकल्पाचे नाव -- साठवण क्षमता -- उपलब्ध साठा

-काटेपूर्ण -- 86.35 - -- 26.52 दलघमी

- वान ---- 81. 95 --- 35.00 दलघमी

- मोर्णा --- 41.46 --- 15.00 दलघमी

- निर्गुणा -- 28.85 --- 7.50 दलघमी

- उमा --- 11.68 --- 0.95 दलघमी

बातम्या आणखी आहेत...