आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात 2 मोठे, 3 मध्यम, 24 लघु प्रकल्प:प्रकल्पात एप्रिल महिन्यातही मुबलक जलसाठा; विविध पाणी पुरवठा योजनांची चिंता मिटली

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिल महिन्यात तापमानात वाढ झाली आहे. मात्र मागील वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील जल प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा योजनांची उन्हाळ्यातील चिंता मिटली आहे.

जिल्ह्यात दोन मोठे, तीन मध्यम आणि २४ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील विविध गावांची तहान भागते तसेच औद्योगिक वसाहतीसह सिंचनासाठी पाणी दिले जाते. त्यामुळेच जलप्रकल्पाचे जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीत मोठे योगदान आहे. त्यामुळेच पावसाळ्यापासून जिल्हा वासीयांचे लक्ष प्रकल्पाच्या जलसाठ्याकडे लागलेले असते. मागील तीन ते चार वर्षापासून जोरदार पाऊस होत असल्याने प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध असतो.

यावर्षीही नोव्हेंबर अखेर पर्यंत पाऊस झाला. नोव्हेंबरच्या अखेरीसही प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले होते. त्यामुळेच एप्रिल महिन्याच्या प्रारंभी देखिल प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे अकोला शहरासह अकोट, तेल्हारा, पातूर, मूर्तिजापूर,बाळापूर आदी विविध शहरांसह ग्रामिण पाणी पुरवठा योजनांना उन्हाळ्यातही पाणी मिळणार आहे.

लघु प्रकल्पातही जलसाठा

जिल्ह्यातील लघु प्रकल्पातही एप्रिलच्या प्रारंभी मुबलक जलसाठा आहे. काही प्रकल्पात अद्यापही ५० टक्क्यांच्यावर जलसाठ्याची नोंद आहे. त्यामुळे ज्या भागात लघु प्रकल्प आहे. त्या भागातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय ही झाली आहे.

जिल्ह्यातील जलसाठा असा

  • काटेपूर्णा ---३२.७३ दलघमी - ३७.९० टक्के
  • वान --- ४२.०४ दलघमी -- ५१.३० टक्के
  • मोर्णा -- १९.५० दलघमी - ४७.०३ टक्के
  • निर्गुणा -- ८.४६ दलघमी - २९.३२ टक्के
  • उमा -- १.४० दलघमी - - १२.०६ टक्के