आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉल्व नादुरुस्त असल्याने गुरुवारी पुरवढा नाही:अकोल्यातील शिवनगर, शिवाजीनगरला शुक्रवारी पाणी पुरवढा होणार

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वितरण प्रणालीवरील 450 आणि 400 मिली मिटर व्यासाचा व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने शिवनगर भागातील दोन आणि आश्रय नगर भागातील एक अशा एकुण तीन जलकुंभाचा पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे या जलकुंभातून ज्या भागाला गुरुवारी पाणी पुरवठा होणार होता. तो आता शुक्रवारी होईल.

शिवनगर भागातील दोन जलकुंभाना महान येथील 25 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. तर शिवनगर भागातील जलकुंभातून आश्रय नगर भागातील जलकुंभाला पाणी पुरवठा केला जातो. बुधवारी 1 फेब्रुवारी रोजी शिवनगर जलकुंभाच्या वितरण प्रणालीवरील व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने 25 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रावरुन या जलकुंभाला होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. व्हॉल्व दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास एक दिवस लागण्याची शक्यता आहे. तसेच व्हॉल्व दुरुस्त झाल्या शिवाय जलकुंभात पाणी साठवण करता येत नसल्याने या तीन जलकुंभावरुन ज्या-ज्या भागाला पाणी पुरवठा होतो. त्या भागाचा पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल महापालिका पाणी पुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

या भागाला होतो पाणी पुरवठा

शिवनगर जलकुंभातून शिवनगर, शिवाजी नगर, खिडकीपूरा, भांडपुरा चौक, वाल्मिकी नगर, गणेश नगर, इंदिरा कॉलनी, गोडबोले प्लॉट, रेणुका नगर, चिंतामणी नगर, न्यु गोडबोले प्लॉट, भारती प्लॉट तर आश्रय नगर जलकुंभातून आश्रय नगर, मेहरे नगर, कार्ट कॉलनी, सरस्वती नगर, डाबकी, बालाजी नगर आदी विविध भागाला पाणी पुरवठा होतो.

बातम्या आणखी आहेत...