आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आवाहनाला प्रतिसाद:मुंबईत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अकोल्याच्या दोन डॉक्टर लेकी बनल्या आरोग्यदूत

अकोलाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दिव्य मराठी विशेष : सायली पांडे, खुशबू हातेकर आहेत मुंबईतील महाविद्यालयांत एमडी अभ्यासक्रमाला

आज कोरोना विषाणूमुळे अख्खे विश्व संकटाचा सामना करत आहे. भारतात दिवसागणिक कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रात कोरोना संक्रमित आणि मृत्यू पावलेल्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. मुंबईमध्ये विषाणूमुळे हाहाकार माजला आहे. मुंबईमधील कोरोना रुग्णांच्या जीवनासाठी अनेक आरोग्यदूत अहोरात्र लढा देत आहेत. या लढ्यामध्ये अकोल्यातील सायली गोविंद पांडे व खुशबू सुनील हातेकर या तरुणींचाही प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. 

अकोलावासीयांकरिता ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. सायन हॉस्पिटल मुंबई येथे एमडी करत असलेली सायली पांडे व पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल नेरूळ नवी मुंबई येथे एमडी मेडिसीन तृतीय वर्षाला असलेली खुशबू हातेकर या दोघीही सध्या कोरोनाच्या संकटाशी मुंबईत दोन हात करत आहेत. मुख्य म्हणजे खुशबू ही २१ मार्चला तीन दिवसांच्या सुटीवर अकोला येथे आली होती. सरकारकडून कोरोनाला हरवण्यासाठी सर्व देशवासीयांना आवाहन करण्यात येत होते. या वेळी खुशबूने मुंबईला जाण्याचा निर्धार केला. घरच्यांना स्पष्ट सांगितले, मी स्वतःची काळजी घेईन, पण देशाप्रति माझं कर्तव्य बजावण्यासाठी मी जाणारच. तिची ही समर्पित भावना बघून सुनील हातेकर यांचेही डोळे पाणावले होते. मात्र मुलीच्या या निश्चयाने त्यांना मनोमन अभिमान व आनंदही वाटला. देशाच्या सेवेत एक निष्ठावान डॉक्टर आपण आपल्या परिवारातून दिला याचा त्यांना सार्थ अभिमान वाटला.

धारावीच्या रुग्णांची सायली करतेय सेवा

सायली सध्या धारावीच्या झोपडपट्टीतील परिसरात राहणाऱ्या लोकांची तपासणी करत आहे. येथील काम खूप जोखमीचे आहे. कारण काही रुग्णांना बघताक्षणीच कोरोनाची शक्यता जाणवते. तरीही त्यांची तपासणी करावी लागते. सर्वांनी सहकार्य केल्यास आपण हे युद्ध नक्कीच जिंकू, असा आत्मविश्वास तिने  व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...