आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध‎:डॉक्टरांवरील हल्ल्याचा‎ अकाेल्यात मार्डतर्फे निषेध‎

अकोला‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ येथील श्री वसंतराव‎ नाईक शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालयात गुरुवारी ५‎ जानेवारीला सायंकाळी कनिष्ठ‎ निवासी डॉक्टर यांच्यावर चाकूने‎ हल्ला झाला होता. या हल्ल्याचा‎ अकोला शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालयातील मार्ड अर्थात‎ महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स‎ संघटनेने निषेध व्यक्त केला आहे.‎ संघटनेने वैद्यकीय शिक्षण‎ मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले‎ की, श्री वसंतराव नाईक शासकीय‎ वैद्यकीय महाविद्यालयात एक ३६‎ वर्षीय रुग्ण ४ जानेवारीला वाॅर्ड‎ क्रमांक २५ मध्ये दाखल झाला‎ होता.

गुरुवारी ५ जानेवारीला‎ सायंकाळच्या सुमारास काही‎ कनिष्ठ निवासी डॉक्टर हे वाॅर्डात‎ रुग्णांची तपासणी करीत असताना‎ तपासणीनंतर एका रुग्णाने चाकूने‎ निवासी डॉक्टरावर हल्ला केला.‎ त्यामध्ये ते जखमी झाले. यामध्ये‎ आणखी एका डॉक्टरच्या हाताला‎ जखम झाली आहे. यापूर्वीही‎ रुग्णालय परिसरात हल्ल्याच्या‎ घटना घडल्या आहेत. त्याचा‎ निषेध मार्डच्या डॉक्टरांनी केला‎ आहे. मारेकऱ्यांना शिक्षा द्या,‎ परिसरात एक पोलिस चौकी द्या,‎ सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ‎ करा, याशिवाय विविध सुरक्षेच्या‎ बाबींची मागणी केली आहे.‎ ‘जीएमसी’मध्ये कँडल मार्च‎ शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालय व सर्वोच्च‎ रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी‎ शुक्रवारी रात्री जीएमसी परिसरातून‎ मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर‎ कँडल मार्च काढत निदर्शने दिली.‎ तुम्ही आम्हाला माराल तर तुम्हाला‎ कोण वाचवेल, अशा घोषणा देत‎ विद्यार्थी, डॉक्टर्स या फेरीत‎ सहभागी झाले होते.‎

बातम्या आणखी आहेत...