आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न:अकाेलेकर भाविकांनी भरली नर्मदा नदीची ओटी

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तीर्थक्षेत्र ओंकारेश्वर येथे अकोलेकर भाविकांकडून नर्मदा नदीची ओटी भरण्याचा सामूहिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला हाेता. श्री संत गजानन महाराजांच्या उपस्थितीत बोटीतील प्रवाशांचे नर्मदा नदीने प्राण वाचवल्याच्या प्रसंगाची आठवण म्हणून या कार्यक्रमाचे श्रावणात आयोजन केले जाते. श्रावण महिन्यात नर्मदा नदीची ओटी भरण्याची जुनी परंपरा आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही परंपरा जोपासत नर्मदा नदीमध्ये गोमुख धारेवर ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात ओकांरेश्वरच्या माजी नगराध्यक्ष मायाबाई चौहाण सहभागी झाल्या होत्या.

संत गजानन महाराज यांच्या श्री विजय ग्रंथात नर्मदा नदीत बोटीतून प्रवास करताना भाविकांचे प्राण वाचवल्याचा प्रसंग आहे. या प्रसंगाची आठवण म्हणून दरवर्षी श्रावणात नर्मदा नदीची ओटी भरण्याचा कार्यक्रम अकोल्यातील भाविकांकडून आयोजित केला जातो. ओंकारेश्वरच्या माजी नगराध्यक्ष यांच्याहस्ते नर्मदा नदीची ओटी भरण्यात आली. या कार्यक्रमाला सुर्यकांता बुंदे, गंगाबाई बुंदे, महानंदा आपोतीकर, सिंधुबाई मोरे, सीमा धनोकार, सरस्वती टापरे, सुनिता टापरे, सत्यबती काटोले, मनुताई दुर्गे, अहिल्याबाई आपोतीकर, कोकीळाबाई मानकर, रंगुबाई दुर्गे, गीता ठाकरे, भक्ती कडू, पुरुषोत्तम बुंदे, धर्मराव आपोतीकर, गोकुळ टापरे, धनोकार, उत्तमराव आपोतीकर, पंजाबराव आपोतीकर, सेवकराम दुर्गे, योगेश काटोले, शुभम टापरे, प्रशांत खेडकर, राहुल वडतकार आदींनी सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...