आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात शासकीय केंद्रावरील प्रिकॉशन डोसच्या मोहिमेला 5 महिने पूर्ण झाली आहेत. सद्यस्थितीत कोविड रुग्ण वाढत असले तरी प्रिकॉशन डोसकडे अनेकजण पाठ फिरवत आहेत. आतापर्यंत एकूण लाभार्थ्यांपैकी 22 हजार 476 लाभार्थ्यांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे. शासकीय केंद्रावर हा डोस मोफत मिळत असला तरी अल्प प्रतिसाद मिळत आहे.
लसीकरणाकडे दुर्लक्ष
जिल्ह्यात जानेवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट सक्रिय असताना निवडक गटांसाठी बुस्टर अर्थात प्रिकॉशन डोस शासनातर्फे जाहीर करण्यात आले होते. यामध्ये ज्यांना सातत्याने कोविड बाधित रुग्णांच्या संपर्कात किंवा समाजात वावरावे लागते असे आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर तसेच सहव्याधी असलेल्या 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना अधिकची सुरक्षा मिळावी म्हणून प्रिकॉशन डोसच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. मात्र आतापर्यंतची स्थिती पाहता फ्रंटलाईन आणि हेल्थ केअर वर्कर्सनेही प्रिकॉशन डोसकडे दुर्लक्ष केलेले दिसते.
हेल्थकेअर वर्करची पाठ
ज्यांना सातत्याने सार्वजनिक ठिकाणे आणि रुग्णांच्या सानिध्यात वावरावे लागते. अशा घटकांनीही प्रिकॉशन डोसकडे दुर्लक्ष केले आहे. आतापर्यंत 12 हजार 710 हेल्थ केअर वर्करचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. त्यापैकी केवळ 2907 जणांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे, तर दुसरा डोस घेतलेल्या 13819 फ्रंटलाईन वर्करपैकी 1511 लाभार्थ्यांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे. 60 वर्षावरील 157647 जेष्ठांपैकी 18058 नागरिकांनी तिसरा डोस घेतला आहे.
अधिकची सुरक्षा
वयोवृद्ध नागरिकांमध्ये आवश्यक अँटीबॉडीज तयार व्हाव्यात यासाठी बुस्टर डोस दिला जात आहे. तर आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर यांनी प्रत्यक्ष कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात राहून काम करावे लागत असल्याने त्यांना अधिकची सुरक्षा म्हणून प्रिकॉशन डोस दिल्या जात आहे. त्यामुळे हा डोस महत्त्वाचा असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.