आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Akolya Filed A Criminal Complaint Against The Husband 'divorce, Divorce, Divorce' Just Left His Wife Saying His Relationship Is Over

अकोल्यात 3 तलाकचा गुन्हा दाखल:'तलाक, तलाक, तलाक, अभी अपना रिश्ता खतम हो गया' म्हणत पत्नीला सोडले

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोरगाव मंजू येथील एकाने तीन वेळा तलाक म्हणून पत्नीला सोडून दिले. यामुळे त्याच्यावर पत्नीच्या फिर्यादीवरून मुस्लीम महिला (विवाहाच्या अधिकारावे संरक्षण) कायदा 2019 चे कलम 4 नुसार बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महिलेचा शारिरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा त्याच्यासह त्याच्या परिवारातील 10 जणांविरूद्ध दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेने तक्रारीत नमूद केले की, शेख हबीब शेख दुला याचेसोबत वाडेगाव येथे मुस्लीम रितीरिवाजानुसार 19 एप्रिल 2012 रोजी विवाह झाला होता. काही दिवसानंतर पतीने गुरांचा व्यवसाय करायचा आहे असे म्हणून माहेरहून एक लाख रूपये आणण्याची मागणी केली. त्यानंतर गर्भवती असतानाही दीर, नणंद, जेठाणी यांनी उपाशीपोटी ठेवून छळ केला. पतीला गोवंशाच्या कत्तलीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती तेव्हाही 75 हजार रूपये माहेरहून दिले होते. मात्र, असे असताना छळ कमी होत नव्हता. अशातच पती फारकतीची मागणी करीत होता.

27 ऑक्टोबर 2022 रोजी पती शेख हबीब, दीर शेख सादीक, चुलत सासरे शेख हयात शेख इमाम असे माहेरी वाडेगाव येथे आले व पतीने तीन वेळा तलाक म्हटले आणि रिश्ता संपला असे म्हणून निघून गेला. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह दहा जणांविरूद्ध भादंविचे कलम 34, कलम 498 अ, मुस्लीम महिला (विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण) कायदा 2029 चे कलम 4 नुसार गुन्हा दाखल केला.

तलाक, तलाक, तलाक… अभी रिस्ता खतम

पती शेख हबीब, त्याचा भाऊ व काका असे तिघे वाडेगाव येथे आले होते. पत्नी घरात होती पतीने आवाज दिला तर पत्नीने त्यांना घरात बोलावले. पतीला पाहून पत्नी आनंदित झाली. त्यांना पाणी आणण्यासाठी स्वयंपाक खोलीत गेली असता पतीने पत्नीला व त्याचे सासूला जवळ बोलावले. पत्नी पतीजवळ बसली. पतीने अचानक पत्नीचे नाव घेऊन तिला ‘मै तुझे तलाक देता हू’ असे म्हणून तीन वेळा ‘तलाक, तलाक, तलाक’ असे म्हटले व ‘मैने तुझे तलाक दिया, अभी अपना रिस्ता खतम हो गया’. तसेच तिच्या दिराने सुद्धा तुझे व आमचे नाते संपले आहे आता तू मोकळी झाली असे म्हणून निघून गेले. विशेष म्हणजे यावेळी विवाहितेचे वडिल किंवा भाऊ सुद्धा घरी नव्हते.

बातम्या आणखी आहेत...