आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेमुदत उपोषण मागे:अकोट बाजार समितीमध्ये सोमवारी कापूस खरेदी सुरू करण्याचे आश्वासन

अकोट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बंद पडलेली कापूस खरेदी सोमवारी सुरू करण्याचे आश्वासन जिल्हा उपनिबंधक यांच्या मार्फत सहाय्यक निबंधक यांनी लेखी स्वरूपात दिल्यामुळे शेतकरी पॅनलच्या वतीने सुरू करण्यात आलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे,’ अशी माहिती उपोषणकर्त्यांनी दिली.

शेतकरी पॅनल प्रमुख माजी आमदार संजय गावंडे यांच्या मार्गदर्शनात प्रदीप वानखडे, ॲड. मनोज खंडारे, डॉ. प्रमोद चोरे, डॉ. गजानन महल्ले, बंडू बोरोकार, सुनील अंबाळकर, मोहन गावंडे रमेश तरोळे, डॉ. अनिल गनगणे यांनी बेमुदत उपोषण केले.

बातम्या आणखी आहेत...