आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अकोट ग्रामीण पोलिसांची अवैध गोवंश मांस वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई; 44 किलो मांस, 40 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

अकोट24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट पोलिसांना ग्रामीण भागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, येवदा येथून एक इसम त्याच्या साथदिारासह अकोट शहराकडे मोटर सायकलने अवैधरित्या गोवंश मांस घेऊन जात आहे. यावरून केलेल्या कारवाईमध्ये ४४ किलो मासासह ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

माहितीनुसार मंगळवारी पो. नि. नितीन देशमुख ह्यांनी दर्यापूर अकोट रोडवर ढगाफाटा येथे स्टाफ व दोन पंच यांचा मदतीने नाकाबंदी केली. या कारवाईमध्ये मोहम्मद अशपाक मोहम्मद मोहम्मद नजीर (वय ४५), मोहम्मद तन्वीर मोहम्मद अशपाक (वय १९), दोन्ही रा. पेठपुरा येवदा, ता. दर्यापूर, जि. अमरावती ह्यांच्याकडून ४४ किलो ५०० ग्रॅम गोवंश मांस किंमत ८, ९०० रू मोटरसायकल एमएच २७ एएस ३२५२ किंमत ३०,००० रू. असा एकूण ३९,९०० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन अकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, अंमलदार जऊळकर, शैलेश जाधव, गोपालसिंग डाबेराव, सचिन कुलट ह्यांनी केली. अवैध गोवंश व गोवंश मांसचे अनुषंगाने पो. स्टे. अकोट ग्रामीणची मागील ४ दविसात पाचवी कारवाई असल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...