आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतभेद:अकोटची बाजार समिती कापसाने फुलली; सरासरी भाव 8300 ते 8700 प्रति क्विंटल

अकोट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाची गुरुवारपासून पुन्हा आवक सुरू झाल्याने बाजार समितीचा परिसर कापसाने फुललेला दिसून येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक आणि कापूस व्यापारी यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद होते. त्यामुळे कापूस खरेदी बंद होती अखेर नवव्या दिवशी यावर तोडगा निघाला असून, डीडीआर यांच्या यशस्वी मध्यस्थी झाल्यानंतर बाजार समितीमध्ये गुरुवारपासून कापूस खरेदीला सुरूवात करण्यात आली. त्यामुळे कास्तकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बाजार समितीत गुरुवारपासून कापूस खरेदी पूर्ववत सुरू झाली असून, कापसाची बाजारपेठ पुन्हा गजबजलेली दिसली. कास्तकाराने आपला कापूस आपल्या हक्काच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणला. सायंकाळपर्यंत अंदाजे ५५० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून, कापसाचे भाव सरासरी ८,३०० ते ८,७०० प्रती क्विंटलपर्यंत होते, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...