आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शन सोहळा:विठू नामाचा गजर अन् नामस्मरणात दर्शन सोहळा ; दोन वर्षांच्या खंडानंतर पालखी अकोल्यामध्ये

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विठू नामाचा गजर, ‘गण गण गणांत बोते’च्या नामस्मरणासह श्री संत गजानन महाराजांची पालखी गुरुवारी सकाळी मुंगीलाल बाजोरीया विद्यालयातून निघाली. दिवसभर पालखी विविध मार्गाने जात सायंकाळी जुने शहरातील हरिहरपेठ येथे मुक्कामस्थळी पोहोचली. पंढरपूरकडे निघालेला हा पालखी सोहळा शुक्रवारी अकोला शहरातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पातूरकडे रवाना होणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर पालखी अकोल्यामध्ये आली. त्यामुळे ‘श्रीं'च्या दर्शनासाठी भाविकांनी अकोला नगरीत गर्दी केली होती. गुरुवारी पालखी अकोला शहरामध्ये दाखल झाली होती. पहिल्या दिवशी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयामध्ये पालखी मुक्कामी होती. येथून गुरुवारी पहाटे पालखी निघाली. हा सोहळा टपाल कार्यालयाजवळून जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरून, अशोक वाटिका चौक, खंडेलवाल भवन, नेहरू पार्क, जुने इन्कम टॅक्स चौक, पंत मार्केट, आदर्श कॉलनी शाळा क्रं. १६ मध्ये सकाळी ८ वाजता पोहाेचला. याठिकाणी ११ वाजतापर्यंत भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. पुढे पालखी सोहळा बोबडे डेअरीजवळून सिंधी कॅम्प मार्गे जेल चौक, अशोक वाटिकेमागून जिल्हाधिकारी कार्यालय, सरकारी बगीचा, खोलेश्वर, शहर कोतवाली, जयहिंद चौक, श्री राजेश्वर मंदिरा समोरून हरिहर पेठ मुक्काम स्थळी पोहाेचला. दुसऱ्या दिवशीही पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी जल, थंडपेय, फराळ आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. पालखीचा मार्ग असा अकोला येथून पालखी भरतपूर, वाडेगाव, देऊळगाव, पातूर, मेडशी, श्री क्षेत्र डव्हा, मालेगाव, शिरपूर जैन, चिंचाबा पेन, म्हसला पेन, किनखेडा, रिसोड, पान कन्हेरगाव, सेनगाव, परभणी, गंगाखेड, परळी, अंबाजोगाई, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर, मंगळवेढा मार्गे ८ जुलैला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल. असा असेल परतीचा प्रवास श्रीक्षेत्र पंढरपूर येथे ९ ते १२ जुलैपर्यंत मुक्काम राहून करकंब, कुर्डूवाडी, उपळाई स्टेशन, भगवान बार्शी, भूम, चौसाळर, पाली, बीड, गेवराई, शहापूर, लालवाडी, जालना, सिंदखेडराजा, बिबी, लोणार, मेहकर, जानेफळ, शिर्ला नेमाने, आवार, खामगाव व ३ ऑगस्टला श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगावात परत येईल. पालखीचा दररोजचा ३० कि.मी.चा प्रवास पालखी दररोज २५ ते ३० कि. मी. पायदळ मार्गक्रमण करून ८ जुलै रोजी पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहाेचणार आहे. आषाढी एकादशी १० जुलैला आहे. विठ्ठलाच्या दरबारी पालखीचा आठवडाभराचा मुक्काम राहणार आहे. त्यानंतर १३ जुलै रोजी ‘श्रीं’चा पालखीसोहळा पंढरपूरवरून शेगावकडे मार्गस्थ होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...