आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा10 वे अखिल भारतीय संमेलन शनिवार व रविवार दि. 07 व 08 जानेवारी, 2023 रोजी पोलिस लॉन्स, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, अकोला येथे आयोजित करण्यात आले आहे.
या संदर्भात आयोजकांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गझल सागर प्रतिष्ठान मुंबई आणि तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी, अकोला यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या संमेलनाचे उद्घाटन 07 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 11 वाजता सुप्रसिध्द कवी आणि सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची निवड करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून दीपक केसरकर, मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा तसेच प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार, लेखक व विचारवंत सुरेश द्वादशीवार उपस्थित राहणार आहेत.
गझलकार विद्यानंद हाडके यांच्या 'गज़लसरा' तसेच गझलकार किरणकुमार मडावी यांच्या 'जिंदगी भाकरीच्या दबावात आहे' या गझल संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजता 'समकालीन गझलेत सामाजिक बदलांचे प्रतिबिंब उमटते का ?' या विषयावर परिसंवाद ठेवला आहे. ज्येष्ठ गझलकार व लेखक प्रसाद कुळकर्णी, इचलकरंजी हे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असतील तर वक्ते म्हणून प्रा. सुनंदा पाटील मुंबई, डॉ. अशोक पळवेकर अमरावती, सुदाम सोनुले अमरावती हे सहभागी होतील. सूत्रसंचालन जगदीश भगत करतील.
गझल बहार : मराठी गझल मुशायऱ्याचे आयोजन दुपारी 4.30 वाजता करण्यात आले आहे. अखेरचे सत्र हे 'गझल गुंजन' या गझल गायन मैफिलीचे असेल.
दुसऱ्या दिवशीचे कार्यक्रम
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.