आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोल्यातील शिवणी येथील पंतप्रधान आवास योजना अंतर्गतची अत्यल्प उत्पन्न गटाकरता निर्मित म्हाडाच्या फ्लॅटची योजना ही फसवी ठरली अजून, अद्यापपर्यंत आम्हाला फ्लॅटचा ताबा मिळालेला नाही. गृहनिर्माण मंडळाच्या तुघलकी कारभारामुळे लाभार्थी हैराण झाले आहेत. आम्हाला फ्लॅटचा ताबा देऊन न्याय देण्याची मागणी लाभार्थ्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
घराची किंमत कमी करण्याची मागणी
या संदर्भात व्याज चढत असलेल्या या घरांच्या योजनेसाठी त्वरित गृहकर्ज उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करून घरांची किंमत कमी करण्याची मागणी अनेक लाभार्थ्यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करून घरांचा ताबा द्या म्हणून अमरावती गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या कार्यालयाचे अनेक वेळा उंबरठे झिजविले असून अद्यापही यावर विचार करण्यात आला नाही.
गरजू नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
शिवणी येथील म्हाडाच्या जागेवर अल्प, अत्यल्प व मध्यम उत्पन्न गटकरता प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 255 फ्लॅटच्या चार मजली फ्लॅटच्या घरकुलांची योजना अंमलात आणली होती. मोठा गाजावाजा करत या योजनेचे तत्कालीन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी उद्घाटन करत गरजू नागरिकांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. गरजुंनी पाच हजार रुपये भरून अर्ज केला. प्रस्तुत योजनेच्या सोडतीचा नागरिकांनी पाठपुरावा केल्यामुळे अखेर दि. 19 सप्टेंबर 2020 रोजी 105 फ्लॅटची सोडत होऊन डिसेंबर 2020 नंतर लाभार्थ्यांना म्हाडाने देकार पत्र प्रदान केले. या नंतर म्हाडाने केवळ सात लाभार्थ्यांनाच घराचा ताबा दिला.
यांची होती उपस्थिती
उर्वरित लाभार्थी हे अनेक बँकांकडे म्हाडाच्या या योजने संदर्भात आवश्यक कागदपत्रा समवेत गृहकर्जासाठी जात असून त्यांना कोणतीच बँक गृहकर्ज देण्यास तयार नाहीत. बँक अधिकारी अत्यल्प उत्पन्न गटाच्या लाभार्थ्यांचे कागदपत्रे हमीदार नसल्याने धुडकावून लावून तुमचे उत्पन्न नाही सबब कर्ज देता येत नसल्याच्या बतावण्या केल्या जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी यावेळी केला आहे. या पत्रकार परिषदेत संजय झाडोकार,पंचशील मोरडे, नितीन कडू,रामराव वानरे,राहूल काटोले, राघवेंद्र माने, महेश घनगाव, निलेश पवार, संजीवनी बागडे, विनोद गुप्ता, नंदिनी जोशी, लक्ष्मी वाघ, निशा ग्यारल, श्रीकृष्ण डहाके, कैलास सोनोने, महेंद्र वाकोडे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.