आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला स्टेशनवर तब्बल 2 तास रोखली गीतांजली एक्सप्रेस:ट्रेनमध्ये दुर्व्यवहार केल्याचा आरोप; कारवाईच्या आश्वासनानंतर सोडली ट्रेन

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला रेल्वे स्टेशनवर गुरुवारी दुपारी तब्बल दोन तास गीतांजली सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवाशांनी रोखून धरली. ट्रेनमध्ये दुर्व्यवहार केल्याचा आरोप प्रवाशांनी केला. याच कारणावरून प्रवाशांनी अकोला रेल्वे स्टेशन येथे पोहचताच ट्रेनपुढे येत गाडीचा पुढला प्रवास रोखला.

4 नंतर गाडी रवाना

यावेळी प्रवाशांनी दुर्व्यवहार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. दरम्यान वंचितच्या स्थानिक नेत्यांनी हस्तक्षेप करून प्रवाशांना शांत केले. त्यानंतर दोन तासानंतर 4.00 वाजता ट्रेन रेल्वे स्टेशनवरून रवाना झाली.

नेमके प्रकरण काय?

नागपूर येथे बुधवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी देशभरातून अनुयायी दाखल होतात. हे सर्व अनुयायी आता परतीच्या मार्गावर आहेत. यातील काही अनुयायी अकोला येथे होणाऱ्या डॉ. प्रकाश आंबेडकरांच्या सभेला हजेरी लावतात. अशात नागपूरमधून गितांजली एक्सप्रेसमध्ये काही अनुयायी बसले होते. गीतांजलीच्या एसी डब्ब्यात बसलेल्या अनुयायांशी काही व्यक्तींनी दुर्व्यवहार केला. यामुळे अनुयायी आक्रमक झाले. अकोला रेल्वे स्टेशनवर दोन वाजता गाडी पोहचताच अनुयायांनी गाडी रोखून धरली. तसेच दोषींवर कारवाईची मागणी केली.

वंचित नेत्यांनी प्रवाशांसोबत साधला संवाद

काही वेळातच स्टेशन परिसरात शेकडो लोकांची गर्दी जमली. महिला प्रचंड आक्रमक झाल्या होत्या. प्रवाशी जोरदार घोषणाबाजी करत होते. ही माहिती स्थानिक वंचितच्या नेत्यांना कळली. त्यांनी लगेच रेल्वे स्टेशन परिसरात धाव घेतली. वंचितचे नेता राजेंद्र पातोडे, आकाश सिरसाट, सामाजिक कार्यकर्ता पराग गवई, तसेच स्टेशन मॅनेजर कावळे, टीआय अरुण नांदुरकार, सीसीआई महम्मद यामिन अन्सारी, पीआय खंडारे, किशोर खडसे, सीआरपीएफचे मिश्रा, खान, अर्चना वाडवे, गौतम शिरसाट यांनी लोकांशी संवाद साधला. त्यांना शांत केले.

रेल्वे स्टेशन परिसरात तणाव

घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रेल्वे प्रशासनाने तत्काळ सीआरपीएफ, जीआरपीएफ बोलावले. वेळीत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली. यामुळे प्रवाशांचा रोष कमी झाली. दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर प्रवाशांनी गाडीचा मार्ग सोडला. यानंतर ट्रेन 4.00 वाजता पुढे निघाली.

बातम्या आणखी आहेत...