आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशा कधी सोडू नये:युतीसाठी आशावादी; पण सध्याच शिवसेनेशी युतीची परिस्थिती नाही : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

अकोला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्ही युतीसाठी आशावादी आहोत, पण आजची परिस्थितीच अशी आहे, की शिवसेनेसोबत युती होऊच शकत नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. या वेळी त्यांनी राज्यातील इतर प्रश्नांवर आपले मत मांडले.

पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांना आता द्विधा मनःस्थितीत ठेवायचे नाही, सर्वच जागा लढायच्या. आम्ही स्वबळावर सरकार आणणार आहोत. माणसाने आशा कधी सोडायची नसते. पण वस्तुस्थिती नाकारून चालता येणार नाही. सुधीर मुनगंटीवार आणि माझे म्हणणे एकच आहे, शिवसेनेशी युती हा भविष्यातला विषय आहे. आज परिस्थिती अशी आहे, की शिवसेनेशी युती होऊच शकत नाही. ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि केवळ ५६ आमदारांवर मुख्यमंत्री होऊन बसले, अशांशी युती होण्याचा प्रश्नच नाही. २०१४ मध्ये वेगळे लढलेल्या शिवसेनेसोबत आम्ही मंत्रिमंडळ बनवलंच ना, असा प्रश्न करत त्यांनी काहीशी संदिग्धता निर्माण केली. शिवसेनेशी युतीच्या मुद्द्यावर भाजपमध्ये मतभेद असल्याचेही त्यांनी नाकारले. दरम्यान, आता चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मोदी आमचे मायबाप आहेत, त्यांच्याविरोधात ऐकणार नाही
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींच्या महाविकास आघाडीशी सध्या बिघडत असलेल्या संबंधांवर चंद्रकांत पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली. आपले सर्वांशी संबंध चांगले आहेत. राजू शेट्टी दररोज मोदींना शिव्या द्यायचे. मोदी आमचे मायबाप आहेत, त्यामुळे मोदी यांच्याविषयी आम्ही एक शब्दही ऐकणार नाही, असे पाटील यांनी या वेळी सुनावले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केवळ पैसाच कळतो
मंदिर उघडण्यासंदर्भात बोलताना पाटील यांनी अजित पवारांवर पलटवार करत, अजित पवार यांना सामान्य भाविकांची काय घालमेल सुरू आहे, हे कळत नाही, त्यांना फक्त पैसा कळतो. अनिल परब यांच्यावरील नवीन घोटाळे भाजपने काढण्याआधी, जुनेच घोटाळे निकाली लागू द्या, असे ते ईडीच्या कारवाईविषयी विचारले असता म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...