आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागांधी ग्राम येथील पर्यायी पूल व गाेपालखेड राज्यमार्ग सुरू करा; अन्यथा कार्यालयांना कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीय संघर्ष समितीने बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभाग जागतिक बंॅक प्रकल्प) व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांना दिला. सदस्यांनी अभियंत्यांशी केली चर्चा करून निवेदनही सादर केले. गांधीग्राम जवळील पूर्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला १५० वर्षापेक्षा जादा काळ झाला आहे. मात्र या पुलाला भेगा पडल्या आहेत. पुलाची परिस्थिती बिकट झाली आहे. एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुलावरून वाहतूक बंद आहे. पर्यायी पुलाचे-रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र हे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे बुधवारी सर्वपक्षीय संघर्ष समितीने आधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ( जागतिक बँक प्रकल्प) कार्यकारी अभियंता प्रवीण सरनायक व नंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे उपकार्यकारी अभियंता अडचुले यांची भेट घेत निवेदन दिले.
यावेळी समितीचे राजू मंगळे, गाेपाल दातकर, मनाेहर शेळके, नितीन ताथाेड, शिवा माेहाेड, शरद प्रभाकर झांबरे,दीप इंघळे, दिलीप लेलेकर, गाेपाल म्हैसने, मुश्ताक शहा, दिनेश वाघमारे, अमरल माेराेदे, भीमराव पळसपगार आदी हाेते. २५ पेक्षा जास्त गावे प्रभावित अकाेला-अकाेट रोडवरील गांधी ग्राम येथील पूल बंद असल्याने २५ पेक्षा जास्त गावे प्रभावित झाली आहेत. त्यामुळे या गावांतील शेतकरी, शेतमजूर, िवद्यार्थु, व्यावसाियक, वीट उत्पादक यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यात किनखेड, काटी-पाटी, राेहणा, दहिहंडा, सुकळी, रेल-धारेल, धामणा, कराेडी आदींचा समावेश हाेता.
काय आहे निवेदनात?
गांधीग्राम येथील पर्यायी पूल ,गेपालखेड दहिहंडा फाटा रस्ता, अकाेला-अकाेट राेडबाबत १५ ते २२ नाेव्हेंबर येथे धरणे आंदाेलन केल्याचे सर्वपक्षीय संघर्ष समितीने निवेदनात नमूद केले. दाेन महिन्यात मार्ग सुरू हाेईल, असे आवश्यक दिले हाेते. मात्र सध्या तीन महिने उलटल्यानंतरही काम पूर्ण झालेले नाही. व्यापारी, शेतकरी, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल हाेत आहेत. मात्र प्रशासन गंभीर नसून, पर्यायी मार्गासाठी ४ काेटी रुपये मंजूर झाले आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे यावर ७ दिवसात ताेडगा न निघाल्यास संबंधित कार्यालयाला ताला ठोकण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.