आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिटकरींनी दवाखान्यात जाऊन डोके तपासून घ्यावे:राष्ट्रवादीचे नेतेच आमच्या संपर्कात, मंत्री अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मिटकरींना म्हणावं दवाखान्यात जाऊन आपले डोके तपासून घ्यावे,' असा खोचक टोला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींना लगावला. ते अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पुढे ते म्हणाले, सध्या सकाळी 6 पासूनच कामाला सुरुवात होत असून, हाच शिंदे-फडणवीस यांचे सरकार आणि महािवकास आघाडीच्या सत्तेतील फरक असल्याचा टोला सत्तार यांनी मविआच्या नेत्यांना लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामातील पद्धत लक्षात घेता अनेक जण आमच्या संपर्क असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील बंडखोर आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मिटकरी यांनी केले होते. यावर अकोला दाैऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पलटवार केला. राष्ट्रवादीचे नेतेच आमच्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अतिवृष्टीसह अन्य कारणांनी नुकसान झाले असून, तिसऱ्यांदा पाहणी सुरू आहे. अतिवृष्टी, किडीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. असे कृषिमंत्री म्हणाले.

'माझा एक दिवस बळीराजा'साठी

माझा एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकरी का निराश होतोय. टोकाचे पाऊल का उचलतो, नेमकी कारणं काय आहेत, त्यावर कोणत्या उपाय योजना करता येतील आदी बाबींचा समावेश असलेला प्लॅन तयार करण्यात येणार आहे. ही संपूर्ण माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सादर करण्यात येईल. त्यानंतर पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत, असेही कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

2 महिन्यांत स्पष्ट होईल

प्रत्येक राजकीय पक्ष, गटाला संघटन वाढविण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे मूल्यमापन करूनच अनेक जण आमच्या संपर्कात असून दोन महिन्यात ते दिसून येईल. असेही ते म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अब्दुल सत्तार म्हणाले, विस्ताराबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच सांगू शकतील. आपण याबाबत काहीही बोलू शकत नाही असे म्हणत या विषयावर थेट बोलणे त्यांनी टाळले.

बातम्या आणखी आहेत...