आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमोल मिटकरींचे आवाहन:शिवव्याख्याते आमदार अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा सौम्य झटका; प्रकृती स्थिर झाल्यानंतर आता समर्थकांना केले आवाहन

दिलीप ब्राह्मणे (अकोला)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवव्याख्याते म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा सौम्या झटका आला होता. हिंगणा येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांना अचानक आपली प्रकृती बिघडल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर त्यांना येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता मात्र आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगताना अमोल मिटकरी यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे.

कृपया कुणी भेटायला येऊ नका
राष्ट्रवादीचे नेते आणि शिवव्याख्याते अमोल मिटकरी यांनी एक व्हिडिओ जारी केला. त्यामध्ये बोलताना ते म्हणाले, की "आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी मी ठणठणीत आहे. सध्या कोविडच्या काळात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मी आयकॉन हॉस्पीटलच्या आयसीयूमध्ये दाखल आहे. कुणीही भेटायला येण्याची कृपा करू नका. याचे कारण, मला माझ्या आरोग्याची जेवढी काळजी आहे, त्यापेक्षा अधिक तुमची काळजी आहे. त्यामुळे मी आवाहन करतो की तुमच्या शुभेच्छा आणि सदीच्छा, सद्भावना शेवटपर्यंत माझ्या पाठीशी आहेत. याच शुभेच्छांच्या बळावर मी सर्व संकटांवर मात करत पुढे जाणार आहे. फक्त तुम्ही येथे येऊन स्वतःचे जीव धोक्यात घालू नये. परवा (14 जुलै) रोजी मला डिस्चार्ज मिळणार आहे. धन्यवाद..."

नेमके काय घडले?
अकोल्यात राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्याया विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे यांचा दौरा होता. या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या बिफार्म कॉलेजमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात बोलताना अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केल्यावर शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माझी मैना गावाकड राहिली, माझ्या मनाची होतीया काहीली हे गाण्यास सुरुवात केली. याच्या काही क्षणातच त्यांचे तोंड किंचित वाकडे झाले. तेथील उपस्थितांना याची जाणीव होताच त्यांना तातडीने मिटकरी यांना रुग्णालयात दाखल केले.

मिटकरी प्रामुख्याने शिवव्याख्याते म्हणून ओळखले जातात. वडील समाजसेवक होते. लहानपणापासूनच त्यांना भजन आणि कीर्तनाची आवड होती. याच माध्यमातून ते आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवत. पुढे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराजांसह महापुरुषांवर व्याख्यान मांडण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून ओळख निर्माण केली. याच कामगिरीवरून त्यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेचे सदस्य पद मिळवून दिले.

बातम्या आणखी आहेत...