आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणुकीत मतदारांना दिलासा:मतदार ओळखपत्रांसोबतच पर्यायी कागदपत्राचा पुरावा ग्राह्य

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार ओळखपत्रासाेबत अन्य पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरून मतदानाचा हक्क बाजवता येणार असल्याचे निवडणूक विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मतदार ओळखपत्रात मतदारांची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात येईल. त्यामुळे अनेक मतदारांचा मतदान करण्याचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे.

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सोमवार, 30 जानेवारी रोजी होत आहे. पदवीधर निवडणूक प्रक्रियेत मतदारांनी सहभागी होवून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. मतदान करताना मतदाराची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करु न शकणाऱ्या मतदारांनी त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पर्यायी कागदपत्रे पुरावा सादर करता येणार आहेत. तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावर विसंगत छायाचित्रामुळे मतदारांची ओळख पटविणे शक्य नसल्यास मतदारास पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करता येईल.

असे आहेत पर्यायी पुरावे

मतदान करण्यासाठी (ओळख पटविण्याकरिता) पर्यायी पुरावे सादर करता येणार आहेत. यात आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, भारतीय पारपत्र, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र, खासदार व आमदारांनी जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, संबधित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेत काम करीत आहेत त्या शैक्षणिक संस्थानी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाव्दारे वितरीत मुळ पदवी-पदविका प्रमाणपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्रांचा समावेश आहे.

असे शाेधता येणार नाव, मतदान केंद्र

पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये आपले नाव व बूथ क्रमांक https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/ या लिंकवर शाेधता येणार आहे. या लिंकवर क्लिक करून आपले नाव , आडनाव व जिल्ह्याचे नाव यासह सर्च केल्यास मतदान केंद्राचे नाव व मतदान केंद्र (खाेली) क्रमांक समजणार आहे.

अकाेला जिल्ह्यात 61 केंद्रांवर हाेणार मतदान

प्रशिक्षणात मतदान केंद्र, मतदान केंद्रावर मतदारांसाठी उभारावयाच्या सोई सुविधा, मतदानाची गोपनीयता, मतपेट्या आदींबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. अकोला जिल्ह्यात 50 हजार 609 पदवीधर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी जिल्ह्यात 61 मतदान केंद्र असून त्यापैकी 32 केंद्र हे अकोला शहरात आहेत.

बातम्या आणखी आहेत...