आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती-पुणे विशेष गाडी उद्यापासून:नियमित गाडीला विशेष गाडीचा दर्जा; गाडी नियमित म्हणून चालविण्याची संघटनांची मागणी

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड 19 दरम्यान बंद करण्यात आलेल्या अनेक गाड्या अद्यापही सुरू करण्यात आलेल्या नाही. यापैकी एक म्हणजे 11405, 11406 अमरावती-पुणे द्वी साप्ताहिक नियमित गाडी. आता 16 डिसेंबरपासून विशेष गाडीचा दर्जा देऊन या मार्गावर 01439, 1440 नंबरने विशेष गाडी सुरू करण्यात येणार आहे. विशेष गाडीत प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागतात. त्यामुळे अमरावती- पुणे नियमित गाडी म्हणून कोरोना काळापूर्वीप्रमाणे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रवाशांना आर्थिक भूर्दंड, प्रतिसाद कमी

नियमित गाडी असून त्या जागी विशेष गाडी चालवणे हे प्रवाशांच्या हिताचे निर्णय नाही. या गाड्यांची सर्वसामान्यांना माहिती नसते. त्यामुळे प्रवाशांची संख्या या गाड्यांमध्ये कमी राहते व अधिक पैसे प्रवाशांना मोजावे लागतात. ही गाडी नियमित गाडी म्हणून सुरू करण्यात यावी या आशयाचे निवेदन विदर्भयात्री संघाद्वारे माननीय रेल मंत्री श्री अश्विनी कुमार वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री सो. सो. दर्शना, विक्रम जर्दोष व रावसाहेब दानवे पाटील, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष त्रिपाठी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांना पाठविण्यात आले आहे.

नियमित गाड्यांना विशेष दर्जा देणे चुकीचे

रेल्वेला विशेष गाड्यांना नियमित गाड्यांमध्ये परिवर्तित करण्याची योजना आखण्यात यावी. या उलट नियमित गाड्यांना विशेष गाड्यांमध्ये परिवर्तित करण्यात येऊ नये असे नियम करण्यात यावे. क्षेत्रातील खासदार अमरातीच्या नवनीत कौर राणा, अकोल्याचे संजय धोत्रे, वाशिमच्या भावना गवळी यांना सुद्धा यासंदर्भात लक्ष देण्याचे निवेदन करण्यात आले आहे. याकडे प्रवाशांच्या हितासाठी लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यांनी केली मागणी

विदर्भयात्री संघाचे अध्यक्ष डॉ. रवि के. अलिमचंदानी, अशोक अग्रवाल, दीप मनवाणी, डॉ. आशुतोष कुलकर्णी, डॉ. गद्रे, डॉ. वोरा, अॅड. मिश्रा, अभियंता विजय खंडेलवाल, डॉ. दुष्यंत आलिमचंदानी, मास्टर लवेश, श्रीराम अग्रवाल, राजू अकोटकर इत्यादीकडून हे निवेदन पाठविण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...