आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून , आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी आचार संहिता कक्ष स्थापन करण्यात आले असून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे
याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी लावलेले झेंडे बॅनर पोस्टर काढण्याची कार्यवाही संबधित विभागाने करावी. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक पथके तयार करण्यात यावे, असा आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी बुधवारी बैठकित दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीबाबत सर्व विभाग प्रमुखांसोबत आढावा घेण्यात आला. यावेळी प्रभारी अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, अभयसिंह मोहिते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
आचारसंहितेची अंमलबजावणी ही सार्वत्रिक निवडणुकीच्या संहितेप्रमाणेच करावयाची असून सर्व शासकीय यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असा आदेश जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठकीत दिला.
कक्षाची स्थापना
पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी आचार संहिता कक्ष स्थापन करण्यात आले असून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी लावलेले झेंडे बॅनर पोस्टर काढण्याची कार्यवाही संबधित विभागाने करावी. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक पथके तयार करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.
ही माहिती दिली
उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी आचार संहितेच्या कालावधीत काय करावे व काय करु नये, याबाबत सविस्तर माहिती विभाग प्रमुखांना आढावा बैठकित दिली. त्यानंतर निवडणूक आयोगाने घोषित केलेला कार्यक्रमाची माहिती देवून निवडणूक आयोगाचे सूचना व निर्देशाबाबत माहिती दिली.
अशी आहे संख्या
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली असून, यात ४४ हजार 506 जणांचे नाव आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत 47 हजार मतदारांची नाेंद झाली हाेती. ही संख्या कमी असून राजकीय पक्ष, इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. मात्र निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या अर्थात 12 जानेवारीपर्यंतही नाेंदणी करता येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.