आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी टँकरचा अपघात:घटनेत 8 वर्षीय मुलीचा मृत्यू; टँकरचालकाला अटक, मार्गावरील वाहतूक विस्कळीत

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकोल्यातील कुरुम गावाजवऴ राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आणि टँकरचा अपघात झाल्याची घटना उघडकीस आली. सदरील ही घटना गुरुवार (3 नोव्हेंबरला) दुपारी 4.00 वाजता घडली. या झालेल्या अपघातात 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. सदरील घटनेमुळे समाजमन हळहळले आहे.

अशी घटली घटना

राष्ट्रीय महामार्गावरील मधापुरी येथून कुरुमकडे येत असलेली मोटरसायकल क्र. एम. एच. 27- सी. आर. 6585 ला कुरुम परिसरात टँकर क्र.जी.जे.06--ए.व्ही.9923 ने अमरावतीकडून मूर्तिजापूर येथे जात असताना पाठीमागून धडक दिली. यामध्ये मोटरसायकल वरील पिंकू अंबादास सोळंके वय - 8 वर्ष रा. मधापुरी या बालिकेचा जागेवरच करून अंत झाला. बालिकेचे वडील अंबादास सोळंके हे गंभीरित्या जखमी झाले.

वाहतूक कोंडी, चालकास अटक

घटनेची माहिती मिळताच माना पोलिस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांनी स्वतः तातडीने घटनास्थळी भेट दिली. हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर टिकार, उमेश हरमकर, ए. एस. आय. नलावडे, पंकज इंगळे यांनी वाहतूक सुरळीत केली. मार्गावर बराच वेळ वासहतूक विस्कळीत झाली होती. अपघातातला कारणीभूत असलेल्या टँकर माना पोलिसांनी पकडला असून चालकास अटक करण्यात आल्याची माहिती ठाणेदार भगत यांनी दिली.

मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले

गेल्या तीन दिवसापासून 3 अपघात झालेले असून यामध्ये दोघे मृत्युमुखी पडले. तर इतर तीन जण जखमी झालेले आहे. त्यामुळे रस्ते आणि वाहने ही मनुष्याच्या सोयीसुविधे करीता आहेत, की त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरण्याकरता आहेत, असा यक्षप्रश्न निर्माण झालेला आहे. रस्त्यावर किंवा राष्ट्रीय महामार्गावर चालताना आणि वाहने चालविताना आपापली जबाबदारी ओळखून आणि वेगावर नियंत्रण ठेवून नियमांचे पालन करणे गरजेचे झाले आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता असून वाहन ही सुविधेकरीता असून जर ते आपले प्राण घेत असतील तर मात्र कुठेतरी विचार करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. अपघातांमुळे होणारी मनुष्यहानी क्लेशदायक आहे.

बातम्या आणखी आहेत...