आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:गोवर संदिग्ध लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा हद्दीसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गोवर संदिग्ध रुग्ण आढळून येत आहेत. ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होण्याची लक्षणे ही गोवरची आहेत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावा. कुपोषित बालकांना गोवरची लवकर लागण होऊन गंभीर लक्षणे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अशा बालकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. प्रारंभी ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक-दोन किंवा तीनही लक्षणे दिसू शकतात.

बातम्या आणखी आहेत...