आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​दक्षतेचे आवाहन:आठवड्यात सरासरी सात गर्भवती महिलांना ‘कोविड-19’चा संसर्ग

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आढळणाऱ्या कोविड रुग्णांमुळे सक्रीय रुग्णांचा आकडा वाढला आहे. अकोला जिल्हा सक्रिय रुग्णसंख्येत राज्यात चौथ्या स्थानावर आहे. अकोल्यासह बुलडाणा, वाशीम, अमरावती जिल्ह्यातील सरासरी सात गर्भवती महिला कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळे कोविड नियंत्रणात आला असला तरी संसर्ग थांबला नाही. बाधितांमध्ये आढळणारी सौम्य लक्षणे ही दिलासादायक बाब असली तरी दुर्धर आजाराच्या रुग्णांना कोविडपासून धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञ देतात.

गेल्या चार मन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट नियंत्रणात आहे. असे असले तरी दोन-चार संख्येने रुग्ण वाढत आहेत. २६ नोव्हेंबरला एकाच दिवसात १७ रुग्ण आढळले आहेत. तत्पूर्वी १५ तारखेला ११ रुग्ण, १२ तारखेला ७ रुग्ण आढळले. त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या आढळणाऱ्या रुग्णांमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणे दिसून येत असल्याने रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात येते.

विदर्भातील दहा जिल्ह्यांत सक्रिय रुग्णसंख्या २३ सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार विदर्भातील अकोला वगळता इतर जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ही २३ आहे. यामध्ये पश्चिम विदर्भात ११ रुग्ण सक्रीय आहेत. तर पूर्व विदर्भात १२ सक्रिय रुग्ण आहेत. यातील ९ सक्रीय रुग्ण नागपूर जिल्ह्यात आहेत. यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात एकही रुग्ण नाही. सक्रिय रुग्णसंख्येत अकोला चौथ्या स्थानावर असल्यामुळे संसर्ग थांबला नाही, हे स्षष्ट होत आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्ण ३२; एकही दाखल नाही दरम्यान शुक्रवारी, दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे ५३ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या ३२ झाली आहे. यातील एकही रुग्ण रुग्णालयात दाखल नाही. जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ६६०६९ झाली आहे.

पाच जिल्ह्यांसाठी जिल्हा स्त्री रुग्णालय हे केंद्रस्थान जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी अकोल्यासह लगतच्या बुलडाणा, वाशिम, अमरावती जिल्ह्यातून महिला दाखल होतात. संदिग्ध महिलांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येतात. दिवसाला १० ते २० चाचण्या करण्यात येतात. यातून आठवड्याला विविध जिल्ह्यातील सहा ते सात महिला बाधित आढळून येत आहेत. त्यांच्यात सौम्य लक्षणे दिसून येतात. - डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय

बातम्या आणखी आहेत...